मुरुड : प्रतिनिधी – मुरुड तालुक्यात नांदगाव सर्वे काशीद भोईघर दांडा बरशिव व मुरुड शहर भागात वादळामुळे सर्वात जास्त सुपारीच्या झाडांचे मोठे नुकसान झाले आहे. लोकपतिनिधींनी पाहणी केल्यानंतर बागायतदारांनी आता साफसफाईकडे आपले लक्ष वेधले आहे. सुपारीची पडलेली झाडे दोन भागात कापून एका बाजूला ठेवण्यात येत आहेत. परंतु यासाठी सरकारने कटर मशीन उपलब्ध करुन देण्याची मागणी केली जात आहे.
सुपारीची झाडे मोठ्या प्रमाणात पडली आहेत. त्यामुळे बागायत दार आपल्या कोयती व कुर्हाड यांच्या साह्याने ही झाडे तोडली जात आहेत पडणार्या झाडांची संख्या खूप मोठी असल्याने सर्व बागायत दार दिवसभर थकून जात आहेत. यासाठी अनेक बागायतदार यांनी कटर मशीन उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली आहे. जेणकरुन सर्व बागायतदारांना मोठा दिलासा मिळणार आहे.
संचारबंदीमुळे सुपारी विकता आली नव्हती त्यातच हे वादळ झाल्याने बागायतदार यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सुपारीची झाडे पडल्याने सुपारी खरेदी विक्री संघाला याचा मोठा फटका सहन करावा लागणार आहे. कारण झाडे पडल्याने सुपारी येणार कशी शासनाने बागायतदारांना मदत करून दिलासा द्यावा.
– महेश भगत, चेअरमन, सुपारी खरेदी विक्री संघ, मरुड
नुकसानग्रस्त भागातील पंचनामे करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असुन ते येत्या दोन तीन दिवसांत हे काम पूर्ण करण्यात येईल त्यानंतर हा अहवाल जिल्हाधिकारीकडे सादर केला जाईल आणि लवकरात लवकर नुकसानग्रस्ताना झालेल्या भरपाईचे वाटप करण्यात येईल,
-गमन गावीत, तहसीलदार, मुरूड