Breaking News

मातृभाषेकडे पाठ फिरवू नका -आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे

खोपोली : प्रतिनिधी
इंग्रजीचे शिक्षण आपल्या पाल्याला मिळावे म्हणून पालक प्रयत्नशील आहेत. इंग्रजी विषयाचे पुस्तक सोपे झाले पाहिजे. त्याकरिता शासनाकडे पाठपुरावा करणार आहे, पण मराठी माध्यमाच्या शाळा वाचविणे हीसुद्धा काळाची गरज आहे. त्यामुळे पालकांनी मातृभाषेकडे पाठ फिरवू नये, असे आवाहन कोकण शिक्षक मतदारसंघाचे नवचनिर्वाचित आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी शनिवारी (दि. 25) खोपोली येथे केले.
खोपोली शहर भारतीय जनता पक्षातर्फे नवनिर्वाचित आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या सत्काराचा कार्यक्रम महाराजा मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला होता. व्यासपीठावर स्थानिक आमदार महेंद्र थोरवे, भाजपचे खोपोली शहराध्यक्ष इंदरमल खंडेलवाल, सरचिटणीस हेमंत नांदे, प्रमोद पिंगळे, प्रभारी सुनील घरत, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील, शहर अध्यक्ष शोर्भा काटे, माजी नगरसेविका अपर्णा मोरे, कामगार आघाडी सेलचे संयोजक सूर्यकांत देशमुख, शिवसेना विधानसभा संपर्कप्रमुख विजय पाटील, शहराध्यक्ष संदीप पाटील, भाजप जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत पुरी, ओबीसी सेलचे रामभाऊ पवार, वैद्यकीय सेलचे डॉ. नागरगोजे, नचिकेत पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष अजय इंगुलकर, सरचिटणीस विनायक माडपे यांच्यासह भाजप, शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या भाषणात ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी हा विजय केवळ माझा नसून सर्वांचा विजय असल्याचे सांगताना कोकण प्रांतातीलच नव्हे; तर महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांवर होणार्‍या अन्यायाचे वाचा फोडण्याचे काम आपण करणार असल्याचे म्हटले. शिक्षक मतदारसंघाचा निधी हा शिक्षणसंबंधी खात्यावरच खर्च करायचा असताना यापूर्वीच्या आमदारांनी रस्ता व गटार यावर खर्च केला. आता मी ग्रामीण भागातील शाळांचा प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेणार आहे, असेही ते म्हणाले.
स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांनी ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या कार्याचा गौरव केला. यापूर्वी शिक्षक मतदारसंघातून एवढे प्रतिनिधी निवडून गेले, पण ज्ञानेश्वर म्हात्रेंसारखा अभ्यासू आमदार झाला नसल्याचे सांगताना भाजप व शिवसेना युतीच्या माध्यमातून जे जे या भागातील प्रश्न आहे ते आम्ही एकत्रितपणे येऊन सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
जिल्हा कामगार संयोजक सूर्यकांत देशमुख यांनी प्रस्ताविकात शहर भाजपच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेतला. या वेळी शिक्षण क्षेत्रातील विविध संस्था व शिक्षक संघटनांनी तसेच स्थानिक कार्यकर्त्यांनी नवनिर्वाचित आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा सत्कार केला.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply