Breaking News

येणार्‍या काळात रायगडचा खासदार भाजपचाच असेल -आमदार प्रशांत ठाकूर

माणगाव : प्रतिनिधी
येणार्‍या काळात रायगड लोकसभा मतदारसंघाचा खासदार हा भाजपचाच असेल, असा विश्वास भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शनिवारी (दि. 25) माणगाव येथे व्यक्त केला. कुणबी भवन सभागृहात आयोजित भाजप मंडल कार्यकर्ता संवाद बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीला भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा, सरचिटणीस अविनाश कोळी, मिलिंद पाटील, सहविस्तारक व रोहा तालुका अध्यक्ष सोपान जांभेकर, माणगाव तालुकाध्यक्ष संजयआप्पा ढवळे, ज्येष्ठ नेते नाना महाले, महिला मोर्चा दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष हेमा मानकर, युवा मोर्चा दक्षिण जिल्हा अध्यक्ष अमित घाग, उपाध्यक्ष चिन्मय मोने, भाजप तालुका उपाध्यक्ष बाबुराव चव्हाण, शहराध्यक्ष नितीन दसवते, महिला मोर्चा तालुका उपाध्यक्ष यशोधरा गोडबोले, प्राजक्ता शुक्ला, नगरसेवक राजेश मेहता तसेच उमेश साटम, गोविंद कासार, संजय जाधव, दिप्ती नकाशे, निलम काळे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते होते.
या वेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आमदार प्रशांत ठाकूर पुढे म्हणाले की, येणार्‍या काही दिवसांत विकासाचे चक्र व पक्षप्रवेश सुरू होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या सभा होऊन आपल्या सर्वांना एक प्रकारे उर्जा मिळेल. रायगड लोकसभा मतदारसंघात भाजपचा खासदार आपल्याला निवडून आणायचा आहे. भाजपची संघटना अधिक मजबूत करायची आहे. पक्षाच्या माध्यमातून वेगवेगळे कार्यक्रम जिल्ह्यात घ्यायचे आहेत. त्याचप्रमाणे केंद्र व राज्य सरकारच्या लोकाभिमुख योजना तळागाळातील जनतेपर्यंत कशा पोहचतील या दृष्टीने सर्वांनी काम करायचे आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जलजीवन मिशन योजना सुरू करून घरोघरी नळ कनेक्शन देऊन जनतेला पिण्याचे पाणी पोहचविण्याचे काम केले आहे. ही योजना आम्ही मंजूर केली असे सांगत विरोधक जनतेची दिशाभूल करीत आहेत, मात्र विरोधकांना ही योजना अमलात आणण्याचे जमले नसल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले.
दरम्यान, या वेळी माणगाव तालुका व शहर भाजपच्या वतीने तालुकाध्यक्ष संजयआप्पा ढवळे, शहराध्यक्ष नितीन दसवते, नगरसेवक राजेश मेहता, जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष चिन्मय मोने व सहकार्‍यांनी भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांचे स्वागत केले.

Check Also

आगामी निवडणुकीतही आमदार प्रशांत ठाकूर यांना विजयी करा -दयानंद सोपटे

तळोजा ः रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आपण आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर विश्वास …

Leave a Reply