Breaking News

नेरळचे रस्ते सौरदिव्यांनी उजळणार

एमएमआरडीएकडून निधी मंजूर : आर्थिक भार कमी होणार

कर्जत : प्रतिनिधी

मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणचा प्रदेश असलेल्या नेरळ ग्रामपंचायतमध्ये प्राधिकरणकडून विकासकामे करण्यात येत आहेत. त्याच माध्यमातून आता एमएमआरडीएकडून प्राधिकरणाने बनविलेल्या आता सौरदिवे लावले जात आहेत. या सौरदिवे यांच्यामुळे नेरळ सौर प्रकाशात उजळणार असून 90 ठिकाणी हे सौरदिवे उभे केले जात आहेत. आगामी काळात नेरळ सौरदिव्यांनी उजळणार असून नेरळ ग्रामपंचायतमधील पथदिव्यांवर होणारा खर्च या सौर दिव्यांमुळे कमी होणार आहे. सध्या नेरळ ग्रामपंचायतीमधील पथदिव्यांची  वीज देयके रायगड जिल्हा परिषदकडून जात आहेत. मात्र सौरदिवे लागल्यानंतर हा आर्थिक खर्चाचा भार कमी होणार आहे. पथदिवे सूर्याच्या प्रकाशावर रात्रीच्या अंधारात उजळणार असल्याने त्यांचा प्रकाश देखील सर्वांना आकर्षित करणारा ठरणार आहे. मुंबई आणि आसपासची शहरे आणि महानगरात ज्याप्रमाणे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कडून परिवाराण पूरक सौर दिव्यांची योजना यशस्वी झाली आहे. योजना नेरळमध्ये प्राधिकरणाकडून राबविण्यात येत आहे. दुसरीकडे एकसारखी आकाराचे हे पथदिवे हे देखील नागरीकरणाच्या मागे असलेल्या नेरळमध्ये येणार्यांना आकर्षण ठरणार आहेत. त्यामुळे आगामी महिन्याभरात नेरळ हे सौरऊर्जेच्या प्रकाशमान होणार आहे आणि त्यातून मोठी वीज बचत आणि आर्थिक खर्चाचे बचत होऊ शकणार आहे.

एमएमआरडीएकडून नेरळ ग्रामपंचायत हद्दीत 90 सौरदिवे लावले जाणार आहेत. त्यासाठी लोखंडी खांब उभे करण्याचे काम सुरु असून सर्व ठिकाणी खांब उभे केले गेले आहेत. आता त्या खांबांवर सौर दिव्यांची किट बसविण्याचे काम सुरु झाले असून कल्याण कडून नेरळ गावात येत असलेल्या रस्त्यावर ते सोलर पॅनल लावण्याचे काम सुरु आहे. मात्र त्या विशेष बाब म्हणून महत्वाच्या ठिकाणी सौरदिवे लावण्यात यावेत अशी सूचना आम्ही प्राधिकरणाला केली आहे.

-मंगेश म्हसकर, उपसरपंच नेरळ ग्रामपंचायत  

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply