Breaking News

श्रीवर्धन उपविभागीय अधिकार्‍यांकडून मान्सूनपूर्व तयारीचा आढावा

श्रीवर्धन : प्रतिनिधी

उपविभागीय अधिकारी  श्रीवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली सन 2019 मान्सून पूर्वतयारी आढावा बैटक 16 मे 2019 रोजी सकाळी 11.30 वाजता मध्यवतीय प्रशासकीय भवन श्रीवर्धन येथे घेण्यात आली. या सभेला श्रीवर्धन तालुक्यातील उपविभागीय अधिकारी श्रीवर्धन, गटविकास अधिकारी प. स. अधिकारी, श्रीवर्धन पोलीस निरीक्षक, तालुका कृषी अधिकारी, उपअभिंयता, महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी श्रीवर्धन, मुख्याधिकारी श्रीवर्धन, वनपरिक्षेत्र अधिकारी, आगार व्यवस्थापन, गटशिक्षणधिकारी पं. स , उपअभिंयता सार्वजनिक बांधकाम विभाग श्रीवर्धन कार्यालयातील सर्व प्रमुख अधिकारी वर्गाला बोलविण्यात आले होते. त्यावेळी उपविभागीय अधिकारी प्रविण पवार व श्रीवर्धन तहसिलदार  जयराज सुर्यवंशी उपस्थित अधिकारी वर्गाल मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेताना म्हणले की श्रीवर्धन तालुक्यामध्ये विविध नैसर्गिक आपत्तीच्यासंर्दभात महत्वाचा यंत्रणा नियंत्रण कक्ष उभारण्यात येत असून. सर्वनी व्यवस्थापनाच्या द़ृष्टीने गांभीर्यपूर्वक जबाबदारी पार पडावी. विशेषत: दरडग्रस्त, पुरग्रस्त भाग तसेच रस्ते मार्ग व समुद्राच्या किनारील ठिकाणी अधिक सतर्कता पाळावी. यात कोणतीही हयगत करू नये.

1 जून पासून आपल्या विभागामध्ये नियत्रंण कक्ष स्ाूरू करण्यात येणार आहे. त्यामध्ये काम करणार्‍या अधिकारी व कर्मचारी यांना गांभीर्यपूर्वक काम करण्याच्या सुचना देण्यात आल्या. वीज मंडळ , बांधकाम विभाग, यांनी तत्पतरता दाखवावी.  श्रीवर्धन महावितरण कंपनी यांनी धोकादायक खांब, ट्रान्सफॉर्मर्स, विद्युत वाहिन्या यावरील झाडांच्या फांदयांचा अडथळा दूर करून घ्यावा. श्रीवर्धन विभागाअंर्तगत असणार्‍या रस्त्यावर दरड कोसळणे झाडे पडणे अशासारख्या  घटना घडतात. या साठी जेसीबी ट्रक्स लगेच त्या त्या परिसरामध्ये उपलब्ध होतील अशी व्यवस्था करून ठेवावी. श्रीवर्धन तालुक्यातील रस्त्यावर वेडीवाकडी वाडलेली झाडे झुडपे तोडावीत जेणे करून कोणत्याही वाहनचालकाला अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी.

या वेळी उपस्थांमध्ये एस. एम. भांडवलकर, आर. एन . सांबरे, रा. म. ठाकरे, एस. एम. यमगर, बाळासाहेब भोगे, रेशमा गाडेकर, इत्यादी कार्यालयाचे अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते. त्यावेळी सर्व कार्यालयातील जबाबदार व्यक्तीचे सपर्ंक होईल अशी व्यवस्था करण्यात आली. नगरपालिका यांनी नागरिकांच्या स्थलांतराची योग्य व्यवस्था करावी, शाळा इमारती सुस्थितीत आहेत का ते पहावे. रोगराई होणार नाही याची दक्षता आरोग्य विभागाने घ्यावे. गुरे ढोरे पुरात बळी जाणार नाही हेही पहावे. नगरपालिका कर्मचारी यांनी गटारनाला यांची साफसफाई पावस पडण्याच्या आधिच करावी. अग्निशमन पथक तयारी असावे अशा सूचना देण्यात आल्या. भरती ओहोटीचे वेळापत्रक मच्छीमाराना सांगण्यास हवामान खात्याच्या सपंर्कात राहण्यास बंदर निरीक्षक व श्रीवर्धन परवाना अधिकारी यांना सांगितले. श्रीवर्धन तालुक्यातील काहि धबधब्यांच्या ठिकाणी पर्यटकांची गर्दी आसते त्या ठिकाणी दुर्घटना होणार नाही. तसेच गर्दीला आवर घालण्यासाठी प्रतिबंधक उपाय योजना कराव्यात त्याच प्रमाणे श्रीवर्धन समुद्रकिनारी असणार्‍या दिघी, आदगाव, वेळास, दिवेआगर, भरटखोल, शेखाडी, आरावी, कोंडविली, जीवनाकोळिवाड, मुळगाव कोळीवाड, दांडा कोळीवाड, हरिहरेश्वर, बागमांडला इत्यादी परिसरातील  नागरिकांना समुद्राच्या भरतीच्या किव्हां उधाणाच्या मोठया पाण्यापासून त्यांना धोका निर्माण होणार नाही. या साठी मोठी भरर्ती अथवा किव्हां खुप पर्जन्यस्थिती परिस्थिती निर्माण झाली तर त्यांच्या व्यवस्था होईल यासाठी

नियोजन करावे.

दरडग्रस्त बागमांडला व मेटकर्णी या परिस्थिती नुसार स्थलांतर कराव्यात. या मान्सूनच्या काळावधी मध्ये कोणला कोणतेही प्रकारची अडचण निर्माण झाल्यास त्यांना तातडीने मदत करावी अश्या प्रकार या सभेमध्ये मार्गदर्शन व सुचना देण्यात आल्या. या वेळी सर्व शासकीय कार्यलयातील अधिकारी वर्गानी आपआपली माहिती श्रीवर्धनचे उपविभागीय अधिकारी व श्रीवर्धन तहसिलदार यांच्या समोर मांडयात आली.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply