Breaking News

17 वर्षीय तरुणीचे अपहरण

पनवेल : आजीकडे राहण्यास आलेल्या 17 वर्षीय एका तरुणीचे अपहरण अज्ञात इसमाने केल्याची तक्रार खांदेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. 17 वर्षीय सीमा शकील आरजू ही मूळ रा. खैरापाडा, बोईसर ही तिची आजी जानकी हिच्या सुकापूर जरीमरी मंदिराजवळील घरी आली होती. तेथे आली असताना अज्ञाताने तिचे अपहरण केले आहे. तिचा रंग सावळा, केस सोनेरी, रंगाने हायलाईट केलेली व लांब, नाक सरळ, उंची अंदाजे 4.5 फूट, बांधा मध्यम असून अंगात निळ्या रंगाचा कुडता व पायात गुलाबी रंगाचा सलवार, तसेच चप्पल घातलेली आहे. या मुलीबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास खांदेश्वर पोलीस ठाणे पोलीस उपनिरीक्षक एच. जी. जुईकर यांच्याशी संपर्क साधावा.

पती बेपत्ता झाल्याची पत्नीने केली तक्रार

पनवेल : करंजाडे येथे राहणारा आपला पती खांदा कॉलनी नवीन पनवेल येथे कामावर जातो असे सांगून घराबाहेर पडला आहे तो अद्याप घरी न परतल्याने तो बेपत्ता झाल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. हमीद अब्दुल रमदुल (30) रा. करंजाडे, रंग गोरा, नाक सरळ, मिशा बारीक, चेहरा गोल, अंगाने सडपातळ, उंची पाच फूट तीन इंच असून अंगात सफेद रंगाचा फुल शर्ट व निळ्या रंगाची फुल पॅन्ट, तसेच पायात सॅण्डल आहे. हातात घड्याळ, सोबत निळ्या रंगाची सॅक व मोबाईल फोन आहे. या व्यक्तीबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे दूरध्वनी 27452333 किंवा पोलीस हवालदार एस. आर. करडे यांच्याशी संपर्क साधावा.

रस्त्यावर आढळला मृतदेह

पनवेल : तालुक्यातील पारपुंड गाव येथील टाटा मोटर्स सर्व्हिस सेंटरच्या समोरच्या रस्त्याला एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला असून त्याच्या नातेवाईकांचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत. त्या व्यक्तीचे अंदाजे वय 45 ते 50 वर्षे, उंची अंदाजे 5.4 फूट, रंग काळा-सावळा, अंगाने सडपातळ, चेहरा उभट, नाक सरळ, दाढी वाढलेली, डोक्यावरील केस काळे-पांढरे असून अंगात शेवाळी रंगाचा टी-शर्ट त्या आतमध्ये सॅण्डो बनियान घातलेली आहे. या व्यक्तीबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे दूरध्वनी 27452333 किंवा पोलीस उपनिरीक्षक ए. बी. संखे यांच्याशी संपर्क साधावा.

मेडिकल स्टोअर्समध्ये चोरी

पनवेल : करंजाडे येथील एका बंद मेडिकल स्टोअर्समध्ये अज्ञात चोरट्यांनी चोरी करून रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडली आहे. करंजाडे बौद्धवाडी येथे रूपाली म्हस्के यांचे लोटस मेडिकल हे दुकान आहे. दुकान बंद असल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनी मुख्य शटरचे लॉक उचकटून आत प्रवेश केला व आतमध्ये असलेली रोख रक्कम लंपास केली आहे. याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

सोन्याचे दागिने अज्ञातांनी लांबविले

पनवेल : बंद घरातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम लांबविल्याची घटना पनवेल शहरातील अशोेका बाग येथील चाळीत घडली आहे. जनार्दन म्हात्रे यांचे अशोक बाग चाळ रूम नं. व्हीआयपी 178 येथे घर असून त्यांचे घर बंद असल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश करून घरातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास केली आहे. याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.

मोटरसायकलची चोरी

पनवेल : गुणे हॉस्पिटल परिसरात उभी करून ठेवलेली मोटारसायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना पनवेल शहरात घडली आहे. गणेश भगत हा गुणे रुग्णालय येथे एका नातेवाईकांना बघण्यासाठी आला होता. त्याने त्याची 12 हजार किमतीची मोटारसायकल क्र. (एमएच 46, क्यू 9639) त्या परिसरात उभी करून ठेवली होती. अज्ञात चोरट्यांनी ती मोटारसायकल चोरुन नेली आहे. याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

वादातून अल्पवयीन मुलास मारहाण

पनवेल : क्रिकेट खेळत असताना मित्रांसोबत झालेल्या वादातून एका 17 वर्षीय मुलास लाकडी बांबूने मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना तळोजा फेज-1 येथील स्काय लाईन इमारतीसमोरील रस्त्यावर घडली आहे. या घटनेत अब्दुल गनी इस्माईल शेख (17) हा जखमी झाला असून त्याच्यावर सध्या कामोठे येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी जखमी मुलाच्या वडीलांनी तळोजा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून एका मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिलेचे दागिने लुटले

पनवेल : पायी जाणार्‍या एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचेे दागिने हिसकावून मोटरसायकलवरून पळ काढल्याची घटना खारघर सेक्टर 12 येथील विजया बँकेसमोरील रस्त्यावर घडली आहे. खारघर सेक्टर आठ येथे राहणार्‍या मीना भवानी बोंडा या सकाळच्या सुमारास केंद्रीय विहार येथील साई मंदिरातून देवदर्शन करून परत आल्या. घरी जात असताना मोटरसायकलवरून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र खेचून ते पसार झाले आहेत. याबाबतची तक्रार खारघर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply