कर्जत : बातमीदार
गेली 30 वर्षे माथेरान येथे जाणार्या पर्यटकांना विनाअडथळा प्रवासी वाहतूक करणार्या नेरळ-माथेरान टॅक्सी संघटनेने पुढील काळात देखील पर्यटकांचा प्रवास माथेरान घाटातून सुखकर व्हावा आणि प्रवासी, तसेच टॅक्सी चालक यांच्यात संबंध आणखी दृढ व्हावे यासाठी सालाबादप्रमाणे महापूजेचे आयोजन केले होते.
नेरळ येथील टॅक्सी स्टॅन्डच्या मुख्य कार्यालयात महापूजेनंतर माणगाव येथील जय मानाई महिला भजन मंडळाच्या वतीने भजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या वेळी महापूजेसाठी आलेल्या प्रवासी मान्यवरांचे आणि पाहुण्यांचे संघटनेचे अध्यक्ष प्रवीण पोलकम, उपाध्यक्ष महेश मिरकुटे, हनिफ नजे, सलीम नजे, सचिव अनिल सुर्वे, खजिनदार नावेद नजे, मिलिंद सुर्वे आणि कार्याध्यक्ष आनंद कोकाटे, मनोहर तरे यांच्यासह अन्य पदाधिकारी स्वागत करण्यासाठी उपस्थित होते. संघटनेच्या वतीने डिसेंबर महिन्यात माथेरानच्या दस्तुरी नाका येथे श्री चांगभले महाराज यांच्या मंदिरात भंडारा आयोजित केला जातो.