Breaking News

तळोजा मजकूर येथे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते विकासकामांचा शुभारंभ

तळोजा ः रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिका क्षेत्रात भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली विकासाची अनेक कामे मार्गी लागत आहेत. त्यालाच अनुसरून तळोजा मजकूर गावात 100 मिलीमीटर व्यासाची नळजोडणी तसेच शिळ तलावात विहीर खोदण्यात येणार आहे. या विकासकामांचे भूमिपूजन माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि. 12) झाले.
पनवेल महापालिका हद्दीतील तळोजा मजकूर गावातील पाण्याची समस्या दूर करण्याच्या दृष्टिकोनातून सिडकोकडून 100 मिलीमीटर व्यासाची नळजोडणी तसेच महापालिकेच्या माध्यमातून 20 लाख तीन हजार 170 रुपये खर्चून शिळ तलावात विहीर खोदण्यात येणार आहे. यासाठी माजी नगरसेवक हरेश केणी यांनी पाठपुरावा केला होता. या विकासकामांचा शुभारंभ माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते झाला.
या कार्यक्रमास माजी नगरसेवक हरेश केणी, रवि म्हात्रे, नंदकुमार म्हात्रे, राजेश महादे, संतोष पाटील, बबन पाटील, सुनील पाटील, भरत पाटील, दीपक पाटील, अशोक पाटील, बाळाराम पाटील, संतोष पाटील, संदीप पाटील, गणेश पाटील, निर्दोष पाटील, गुरू मुंबईकर, सचिन पाटील, कैलाश पाटील, मदन पाटील, वैभव पाटील, वंदना पाटील, युवा कार्यकर्ते प्रतिक पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Check Also

महापालिका कर्मचार्‍यांचे प्रश्न सोडवण्यासाठी संपूर्ण सहकार्य -माजी सभागृह नेते परेश ठाकूर

म्युन्सिपल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने मेळावा पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांचा मेळावा म्युन्सिपल एम्प्लॉईज …

Leave a Reply