Breaking News

चिंध्रण येथे भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते विहीर, बंधारा कामाचे भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यातील चिंध्रण येथे भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून जल जीवन मिशन योजनेंतर्गत 92 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून विहीर आणि बंधारा बांधण्यात येणार आहे. या विकासकामांचे भूमिपूजन भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते रविवारी (दि. 12) झाले.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून जल जीवन मिशन योजना राबवली जात आहे. प्रत्येकाला पाणी मिळाले पाहिजे हा या योजनेचा उद्देश असून या अंतर्गत भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून चिंध्रण ग्रामपंचायतीसाठी 92 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीमधून विहीर आणि बंधारा बांधण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते झाले.
भूमिपूजन समारंभास भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस भूपेंद्र पाटील, भाजप नेते एकनाथ देशेकर, चिंध्रण ग्रामपंचायतीचे सरपंच एकनाथ पाटील, उपसरपंच सुजीत पाटील, माजी सरपंच नरेश पाटील, शिवाजी दुर्गे, नरेश सोनावळे, जीवन पाडेकर, मनोज कुंभारकर, संतोष देशेकर, माजी सरपंच गणपत कडू, दिनेश पाडेकर, महादेव गडगे, एकनाथ मुंबईकर, नामदेव पाटील, हिरामण पाटील, मधुकर पाडेकर, तुषार दुर्गे, अरुण पाटील, अनंता कडू, चंद्रकांत देशेकर, अशोक साळुंके यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply