मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्रातील गड किल्ल्यांवर आता मद्यपान केल्यास तीन महिने तुरूंगाची वारी होऊ शकते कारण तसा प्रस्ताव राज्य सरकार मंजुरीसाठी पाठवणार असल्याची माहिती मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी (दि. 13) सभागृहात दिली.
गड किल्ल्यांवर मद्यपान करणार्या फक्त तीन महिन्यांचा तुरूंगवासच नाही, तर सोबत दहा हजारांचा दंड ठोठावण्याचीही तयारी राज्य सरकारने केलीय. त्याचसोबत, प्रत्येक गड किल्ल्यावर हेरिटेज मार्शल नेमण्याचीही घोषणा मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास महाराष्ट्राच्या इतिहासाचा अमूल्य ठेवा असणार्या आणि ज्यांच्या अंगाखांद्यांवर इतिहास घडला, त्या गड किल्ल्यांवर मद्यपान करून त्याचं पावित्र्य घालवणार्यांना चांगलाच चाप बसेल, अशी आशा निर्माण झाली आहे.
Check Also
अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर
मुलीवर अत्याचार करणार्या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …