पेण : प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवसनिमित्त भाजपच्या वतीने सेवा सप्ताह म्हणून साजरा करण्यात येत असून त्यानिमित्ताने पेण मध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन रविवारी (दि. 20) पेण शहर भाजप युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आले होते.
कोरोना या महाभयंकर रोगामुळे देशातील जनतेला रक्ताची गरज भासत आहे. सध्या रक्तदान करण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यासाठी आमचे छोटेसे योगदान म्हणून तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या शिबिराचे आयोजन केले असल्याचे यावेळी पेण शहर भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष मितेश शहा यांनी सांगितले.
या वेळी रक्तदान शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमास भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, जिल्हा चिटणीस मिलिंद पाटील, शहर अध्यक्ष हिमांशू कोठारी, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस शिवाजी पाटील, विशाल शिंदे हे उपस्थित होते.
’जनसेवा हीच ईश्वर सेवा’ या प्रेरणेतून आयोजित केलेल्या या रक्तदान शिबिराला आमदार रवीशेठ पाटील यांनी भेट देत भाजप युवा मोर्चा पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे कौतुक केले. या वेळी नगराध्यक्षा प्रितम पाटील, तालुकाध्यक्ष श्रीकांत पाटील, गटनेते अनिरुद्ध पाटील, भाजप जिल्हा चिटणीस बंडू खंडागळे, नगरसेवक दर्शन बाफना, रविंद्र म्हात्रे, माजी नगरसेवक सुधीर जोशी, कुणाल पाटील, अभिराज कडू आदींसह भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या वेळी रक्तदान केले.
हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी एमजीएम रुग्णालयातील मेडिकल सोशल वर्कर राजेश आतर्डे, टेक्निशियन मनोज जाधव, सुवर्णा मोरे, निलेश पाटील, अब्दुल कयूम, आनम शेख, अमिता काजी यांचे सहकार्य लाभले.