Breaking News

भावनिक न होता स्वतंत्र विद्यापीठाकडे वाटचाल करावी- माजी कुलगुरू विजय खोले

पनवेल : प्रतिनिधी
सीकेटी महाविद्यालयाची स्वायत्त विद्यापीठाकडे वाटचाल होत असताना जग कोठे चालले आहे याचा विचार करून भावनिक न होता स्वतंत्र विद्यापीठाकडे वाटचाल करावी लागेल, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू विजय खोले यांनी रविवारी ( दि. 12) महाविद्यालयाच्या दोन दिवसीय रौप्य वर्ष महोत्सव समारंभाची सांगता करताना प्रतिपादन केले.
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर (सीकेटी) आर्टस, कॉमर्स अँड सायन्स (स्वायत्त) महाविद्यालयाला 25 वर्षे झाल्याने या महाविद्यालयाचा दोन दिवसीय ’रौप्य वर्ष महोत्सव समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्याची सांगता मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू विजय खोले, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिल पाटील, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, महाराष्ट्राचे उच्च शिक्षण विभागाचे माजी संचालक एस. एन. पठाण, माजी प्र. कुलगुरू नरेशचंद्रा, रुसाचे माजी वरिष्ठ सल्लागार विजय जोशी, विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. अजय भामरे, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, संस्थेचे सदस्य अनिल भगत, हरिश्चंद्र पाटील, जे. जी. जाधव, डॉ. प्रदीप कामतेकर, जयंत आपटे, पराग आजगावकर, प्राचार्य गणेश ठाकूर, प्राचार्य पी. पी. पवार, प्राचार्य अशोक वाघ, संस्थेचे सचिव डॉ. एस. टी. गडदे आदींसह प्राध्यापक, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी माजी कुलगुरू विजय खोले यांनी बोलताना, मुंबई विद्यापीठाकडून नावाजलेले सीकेटी महाविद्यालय आज स्वायत्त झाले आहे. आता त्याचे स्वतंत्र विद्यापीठात रूपांतर करायचे आहे. ते होईल यात शंका नाही, पण त्यासाठी आर्थिक तरतूदी बरोबरच नवीन पिढीसाठी नवीन अभ्यासक्रम सुरू करावे लागतील. विद्यापीठाला आपले वेगळेपण सिध्द करावे लागेल. येथील प्राध्यापकाना आपली शिक्षकवण्याची पद्धत बदलावी लागेल. नवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे लागेल. आंतरराष्ट्रीय दर्जाचा अभ्यासक्रम तयार करावा लागेल, जग कोठे चालले आहे याचा विचार करूनच भावनिक न होता स्वतंत्र विद्यापीठाकडे वाटचाल करावी लागेल, असे त्यांनी सांगितले.
तुकडोजी महाराज विद्यापीठाचे कुलगुरू एस. एन. पठाण यांनी, आजचा सोहळा हा कृतज्ञता सोहळा असल्याचे सांगून शिक्षक महाविद्यालय घडवतात. आपण रामशेठ ठाकूर यांच्याकडून प्रेरणा घेतल्याचा आवर्जून उल्लेख करून माणसामुळे माणूस घडतो, पैशाने नाही, आज अशी घडवायची आहेत. ती जबाबदारी प्राध्यापकांची असल्याचे त्यांनी सांगितले. माजी प्रकुलगुरू विजय जोशी यांनी, रामशेठ स्वप्न पाहतात आणि ती प्रत्यक्षात उतरवतात असे सांगून पुढच्या 25 वर्षाच्या योजना करण्याचा आजचा दिवस असल्याचे सांगितले. नरेश चांदरा यांनी हे महाविद्यालय प्रगती पथावर रहाणार आहे . जे चांगले ते सीकेटी मध्ये आले पाहिजे यासाठी संस्थेचा प्रयत्न असतो याचे आपण साक्षीदार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी महाविद्यालयातील विद्यापीठात गुणवत्ता प्राप्त व खेळात प्राविण्य मिळवणारे विद्यार्थी, यशस्वी माजी विद्यार्थी त्यांचा सत्कार हस्ते करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचाही भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

आज 25 वर्षे झाली. आता पुढील कामकाज अजून जोमाने करायचे आहे कारण 50 वर्षांनंतर त्याचे चांगले फळ लोकांना दिसले पाहिजे. तुमच्यासारख्या गुरूंमुळे आमची प्रगती झाली. तुमच्यामुळे हे यश मिळाले म्हणून तुमचा आज सत्कार केला. विद्यार्थ्यानी जे यश मिळवले त्यामुळे आमचे नाव झाले. आपले धोरण दिशा एकाच असल्याने आपण पुढे जात आहोत.
-लोकनेते रामशेठ ठाकूर, माजी खासदार

मला सीकेटीचा हेवा वाटतो. रामशेठचा प्रवास हा अण्णांसारखाच आहे. त्यांनी नोकरी केली, उद्योग केला, राजकारण आणि समाजकारण केले. रामशेठनी पण तसेच केले. त्यांनी रयतची स्थापना केली. आज रयत ब्रँड आणि रामशेठ या दोघांवर आम्ही संस्था चालवतो. हा रामाचा स्पर्श आहे. परिसापेक्षा मोठा आहे. विद्यापीठ उभे राहावे हिच इच्छा असून त्यासाठी सर्व मदत आम्ही करूच.
-अनिल पाटील, अध्यक्ष, रयत शिक्षण संस्था

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply