Breaking News

इंडस्ट्रीअल टाऊन अध्यक्षपदी डॉ. पाटील

पनवेल ः वार्ताहर

सामाजिक कार्यात सदैव आघाडीवर असणार्‍या रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाऊनच्या अध्यक्षपदी पनवेलमधील सर्वात मोठ्या लाईफ लाईन हॉस्पिटलचे संचालक डॉ. प्रकाश पाटील यांची निवड झाली असून नुकताच त्यांनी मावळते अध्यक्ष व्ही. सी. म्हात्रे यांच्याकडून अध्यक्षपदाचा पद्भार समारंभपूर्वक स्वीकारला.  याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून भावी प्रांतपाल रश्मी कुलकर्णी तर प्रमुख अतिथी म्हणून सिडकोचे अध्यक्ष, रोटेरियन, आमदार प्रशांत ठाकूर, सहाय्यक प्रांतपाल श्याम फडणीस उपस्थित होते.

याप्रसंगी मावळते अध्यक्ष व्ही. सी. म्हात्रे यांनी आपल्या कार्यकाळात केलेल्या सुमारे 250 प्रोजेक्टबाबत माहिती दिली. चावणे गाव, बंदररोड पनवेल, कामोठे येथे टॉयलेट ब्लॉक प्रोजेक्टची यशस्वी उभारणी केली, वाजे, चिपळे आदि ठिकाणी हॅपीस्कूल प्रोजेक्ट ट्रस्टच्या सहकार्याने उभारले. समाजातील अनेकांना नेशन बिल्डर अ‍ॅवॉर्ड सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले. असंख्य ‘रायला’चे खेडोपाडी सूत्रबध्द आयोजन करुन रोटरीची चांगली प्रतिमा सर्वदूर पोहोचविण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला.  आरोग्य शिबीरे, नामवंतांचा सहभाग असलेली चर्चासत्रे, कला-क्रीडा अशा सर्वच क्षेत्रात उपक्रम आणि स्पर्धांचे यशस्वी आयोजन केले त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला, अशी माहिती त्यांनी दिली. प्रमुख पाहुण्या रश्मी कुलकर्णी यांनी रोटरी क्लब करीत असलेल्या उत्तुंग कामगिरीबद्दल समाधान व्यक्त करुन विष्णू म्हात्रे यांच्या कार्याची प्रशंसा केली. यापुढेदेखील रोटरी क्लबने असेच लोकोपयोगी कार्य करीत रहावे, अशा सदिच्छा व्यक्त करुन डॉ. प्रकाश पाटील यांना उज्ज्वल यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.  सिडकोचे अध्यक्ष रोटेरियन आमदार प्रशांत ठाकूर यांनी मावळते अध्यक्ष व्ही. सी. म्हात्रे यांनी केलेल्या प्रचंड कार्याची मुक्तकंठाने प्रशंसा  करुन नूतन अध्यक्ष डॉ. प्रकाश पाटील यांच्या कारकिर्दीतही असेच वैशिष्टयपूर्ण उपक्रम राबवावेत, त्यासाठी माझ्याकडून जास्तीत जास्त सहकार्य केले जाईल, असे आश्वासन दिले.  रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाऊनला उत्कृष्ट कार्याची समृध्द परंपरा लाभलेली आहे.  क्लबची अशीच घोडदौड यापुढेही चालूच राहील, असा विश्वास व्यक्त करुन पाणी टंचाईची दाहकता लक्षात घेता आता रोटरीने जलसंवर्धनाकडे वळावे, असा मौलिक सल्लाही दिला. नूतन अध्यक्ष डॉ. प्रकाश पाटील यांनी व्ही. सी. म्हात्रे यांनी गतवर्षी प्रचंड कार्य केले आहे, तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीन, असे सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रोहित जाधव आणि ध्वनी तन्ना यांनी  केले.  यावेळी 19 नवीन सभासदांनी रोटरी परिवारात प्रवेश केला, त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी सर्व सदस्य, नागरिक उपस्थित होते.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply