Breaking News

ई-रिक्षा पूर्ववत सुरू करा!

माथेरान बंद, अधीक्षक कार्यालयावर नागरिकांचा मोर्चा

कर्जत ः प्रतिनिधी
ई-रिक्षा पूर्ववत सुरू व्हावी यासाठी शुक्रवारी (दि. 17) माथेरान बंद ठेवण्यात आले होते. त्याचप्रमाणे नागरिकांनी अधीक्षक कार्यालयावर मोर्चा नेला. या वेळी विविध घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. माथेरानमध्ये तीन महिन्यांच्या पायलेट प्रोजेक्टनंतर ई-रिक्षा बंद करण्यात आल्या आहेत. या ठिकाणी ई-रिक्षासेवा पूर्ववत सुरू करावी तसेच धूळविरहित रस्त्यांची कामे ताबडतोब करण्यात यावीत या मागणीसाठी माथेरानमधील नागरिकांसह व्यापार्‍यांनी बंद पाळून अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढला. या वेळी अधीक्षक दीक्षांत देशपांडे आणि मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. भरउन्हात विविध पक्षांचे प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते. महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर होती. त्याचप्रमाणे शालेय विद्यार्थीदेखील होते.

Check Also

खारघरमध्ये नाट्यगृह उभारणीकरिता भूखंड द्या

आमदार प्रशांत ठाकूर यांची सिडकोकडे आग्रही मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त एज्युकेशनल हब असलेल्या खारघरमध्ये …

Leave a Reply