आमदार महेश बालदी यांच्या मागणीनुसार निधी
पनवेल ः रामप्रहर वृत्त
आमदार महेश बालदी यांच्या मागणीनुसार उरण विधानसभा मतदारसंघासाठी राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये 147.50 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. प्रामुख्याने हा निधी रस्त्यांच्या विकासासाठी आहे.
यामध्ये ग्रामीण मार्गाकरिता 47.50 कोटी, प्रमुख जिल्हा मार्गासाठी 58 कोटी, कोन-सावळे रस्त्याच्या उर्वरित कामासाठी 20 कोटी रुपये, दांड-तुराडे रस्त्यासाठी 19 कोटी रुपये आणि गुळसुंदे-जांभिवली-कराडे रस्त्यासाठी तीन कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. त्याबद्दल आमदार महेश बालदी यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांचे आभार व्यक्त केले.
महेश बालदी उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार झाल्यानंतर या मतदारसंघाचा झपाट्याने विकास झाला. मागील दोन टर्मच्या तत्कालीन आमदारांकडून कोन-सावळे रस्ता खड्ड्यात गेला होता. कार्यतत्पर आमदार महेश बालदी यांनी तत्काळ या विषयात लक्ष देऊन प्रश्न मार्गी लावला. आता दांड-तुराडे रस्त्याचाही विकास होणार आहे, त्यामुळे प्रवासी, वाहनचालकांना मोठा दिलासा मिळून इंधनाचीही बचत होणार आहे.