योग्य उपाययोजना करण्याची सूचना
पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिका हद्दीतील नवीन पनवेलच्या पोदी सेक्टर 16 येथील लक्ष्मी विष्णू सोसायटी आवारात महावितरणची डीपी आहे. या डीपीमुळे तेथे राहणार्या रहिवाशांना पावसाळ्यात विजेचा झटका लागण्याची शक्यता असल्याने या संदर्भात नागरिकांच्या अनेक तक्रारी होत्या. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी गुरुवारी (दि. 1) अधिकार्यांसह पाहणी करून यासंदर्भात लवकरात लवकर उपाययोजना करण्याची सूचना केली.
पोदी येथील लक्ष्मी विष्णू सोसायटीमध्ये असलेल्या विद्युत डिपीमुळे आगामी पावसाळ्यात येथे राहणार्या रहिवाशांना विजेचा झटका लागण्याची शक्यता आहे. याबाबत अनेक तक्रारी नागरिकांना केल्या होत्या. याची दखल घेत पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी या सोसायटीमधील डीपीची महावितरणचे अधिकारी नानोटे, सिडको अधिकारी गौरव इंगळे यांच्यासोबत पाहणी केली आणि या संदर्भात लवकरात लवकर उपाययोजना करण्याची सूचना केली.
या वेळी नगरसेवक तेजस कांडपिळे, अजय बहिरा, नगरसेविका चारुशीला घरत, वृषाली वाघमारे, तसेच किशोर मोरे, जयेश ठाकूर, सोसायटीचे चेअरमन दिलीप शिर्के, शैलेश पाटील, गौरव कांडपिळे, संतोष साळवे यांच्यासह स्थानिक रहिवासी उपस्थित होते.