Breaking News

मत्स्यदुष्काळामुळे बाजारात शुकशुकाट

मुरूडमध्ये होड्या किनारी विसावल्या; व्यावसायिक, खवय्यांना मासळीची प्रतीक्षा

मुरुड : प्रतिनिधी

मुरुड हे पर्यटनस्थळ असल्याने येथे दर शनिवार, रविवार पर्यटकांची गर्दी असते. पर्यटकांना आवडणारे मासे मात्र महाग झाल्याने स्थानिक नागरिकांसह पर्यटकांचीसुद्धा नाराजी वाढली आहे. कारण गेल्या अनेक दिवसापासून मासळी मिळण्याचे प्रमाण घटल्याने मासळी मार्केटमध्ये मासळी कमी येऊ लागली आहे. त्यामुळे पर्यटकांना आवडणारी मासळी चढ्या किमतीत विकली जात आहे. अचानक मासळी मिळण्याचे प्रमाण कमी झाले व त्यातच खवय्यांची नाराजी ओढवली गेली. सध्या मासळी दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने गरीब व मध्यमवर्गीयांनी मासळी घेणे टाळले आहे. मासळीची आवक कमी झाल्याने मुख्य शहरातील बाजारपेठा ओस पडल्या आहेत. खोल समुद्रात जाऊन सुद्धा तुरळकच मासळी मिळत असल्याने खर्च जास्त व कमाई कमी प्रमाणात होत असल्याने आज समुद्र किनारी असंख्य होड्या उभ्या आहेत. मुरुड तालुक्यात लहान व मोठ्या होड्या साडेसातशेच्या घरात असून मासळी मुबलक न मिळत असल्यामुळे 60 टक्के होड्या किनार्‍यालाच आहेत. 72 हजाराची लोकसंख्या असून सुद्धा निवळ मासेमारीवर खरेदी होत असल्याने बाजारपेठेमध्ये धंदाच मंदावला आहे. बाजारात गरजेपुरती खरेदी हे धोरण अवलंबिल्यामुळे धंदा मंदावला असून व्यापारावर मंदीची सावट आल्याचे बोलत जात आहे.  वातावरणातील बदलामुळे मच्छिमारांचे मोठे आर्थिक नुकसान होऊन ते कर्जबाजारी झाले आहेत. बदलत्या वातावरणाचा गंभीर परिणाम मच्छिमारांना सहन करावा लागला आहे. खोल समुद्रात जाऊन सुद्धा मुबलक मासळी मिळत नाही.त्यामुळे मच्छिमार पुरते हैराण झाले आहेत. सागर कन्या मच्छिमार संघाचे उपाध्यक्ष मनोहर मकु यांनी सांगितले, नियमाप्रमाणे तीन महिन्यांनी मिळणार परतावा 2021 व 22चे प्रकरण पाठवले आहेत. मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगुंटीवार याना विनंती आहे, जिल्ह्यातील मच्छिमारांचा परतावा लवकरात लवकर काढावा अशी विनंती करीत आहोत.

दर भिडले गगनाला

आज किराणामाल विक्रेता, कापड विक्रेता व सर्व व्यवसाय ठप्प झाले असून एका मासळीवर बाजरपेठा शांत झाल्या आहेत. मासळी कमी मिळत असल्याने मुरुड, आगरदांडा, राजपुरी, कोर्लई, बोर्ली आदी भागातील होड्या किनार्‍याला लागल्या आहेत. मासळी कमी मिळत असल्याने मासळीचे दर मात्र गगनाला भिडले आहेत.त्यामुळे पर्यटकांसह स्थानिक नागरिक हवालदिल झाले आहेत.

खोल समुद्रात जाऊनसुद्धा मासळी मिळत नाही. रायगड जिल्ह्यातील मच्छिमारांसाठी खावटी योजना राबवून राज्य सरकारने मच्छिमारांना मदतीचा हात द्यावा.

 -मनोहर मकु, सागर कन्या मच्छिमार संघाचे उपाध्यक्ष

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply