Breaking News

केंद्र शासनाच्या योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहचवा -अश्विनी पाटील

खोपोली : प्रतिनिधी

भाजप कार्यकर्त्यांनी बूथ सशक्तिकरण अभियान प्रभावीपणे राबवावे तसेच या अभियानाच्या माध्यमातून पक्ष संघटना वाढीसाठी, केंद्र शासनाच्या ज्या कल्याणकारी योजना आहेत त्याची माहिती जनसामान्यांना द्यावी, असे आवाहन भारतीय जनता पक्षाच्या उत्तर रायगड महिला जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आवाहन केले. भारतीय जनता पक्षाच्या बूथ सशक्तिकरण अभियान यशस्वी करण्यासाठी स्थानिक पातळीवर खोपोली शहराच्या वेगवेगळ्या प्रभागात सध्या बैठकांचे सत्र सुरू आहे. शक्ती केंद्रप्रमुख संजय म्हात्रे यांच्या 290, 291, 292 या बुथ प्रमुखांची बैठक स्वामी विवेकानंदनगर, मोगलवाडी येथील महिला जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील यांच्या निवासस्थानी गुरुवारी पार पडली. या वेळी पाटील बोलत होत्या. यावेळी त्यांनी बैठकीत अभियानाचा आढावा घेताना पदाधिकारी व कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या जबाबदारी देऊन हे अभियान यशस्वी करण्याचे आवाहन केले. या वेळी वैद्यकीय सेलचे सहसंयोजक विकास नाईक खुरपडे यांनी अभियानाची माहिती दिली. बैठकीला भाजप खोपोली शहर सरचिटणीस हेमंत नांदे, प्रमोद पिंगळे, युवा नेते राहुल जाधव, चिटणीस गोपाळ बावस्कर, शहर उपाध्यक्ष दिलीप पवार, डॉक्टर बबन नागरगोजे, महिला मोर्चा शहर सरचिटणीस अश्विनी अत्रे, माजी नगरसेविका अनिता शहा, अपर्णा साठे, सुमिती महर्षी, युवा मोर्चा शहर अध्यक्ष अजय इंगुलकर अनिल कर्णक, संतोष चौधरी, ओबीसी सेलचे सुनील नांदे, इत्यादींसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीचा समारोप संजय म्हात्रे यांनी आभार प्रदर्शन करताना अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व कार्यकर्ते प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

Check Also

सिडको प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबत बैठक

प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश करा -आमदार प्रशांत ठाकूर मुंबई : रामप्रहर वृत्त सिडको प्रकल्पग्रस्तांनी …

Leave a Reply