Breaking News

जेएसडब्ल्यू कंपनीतून माल चोरी केल्याप्रकरणी त्रिकुटाला अटक

पेण : प्रतिनिधी

डोलवी येथील जेएसडब्ल्यू कंपनीतील फेरोनिओबियम स्टोअरमधून  जवळ जवळ 6 लाखाचा फेरोनिओबियम धातू चोरी केल्याप्रकणी वडखळ पोलिसानी तिघांना अटक केली आहे. याबाबत माहिती अशी कि, सोमवार 20 मार्च सायंकाळी 7: 56 ते मंगळवार 21 मार्च सायंकाळी 7: 56 दरम्यान जे.एस.डब्ल्यु स्टील कंपनी डोलवी येथे फेरोनिओबियम स्टोअर मधून आरोपी नं. 1 ते 3 रा.पेण, ता.पेण यांनी संगनमत करून फेरोनिओबियम स्टोअरमधून सुमारे 250 किलोग्रॅम वजनाचे फेरोनिओबियम धातुचे तुकडे कंपनीच्या परवानगी शिवाय घेवून जात असताना आढळून आल्याने फिर्यादी निशांत सनकाले रा.डोबिवली, पुर्व ठाणे यांनी त्यास थांबवून कंपनीचा एक जबाबदार अधिकारी या नात्याने ते फोरोनिओबियम धातुने भरलेल्या गोण्या त्यांनी ताब्यात घेवून आरोपींना प्रतिबंध करण्याचा प्रयत्न केला असता आरोपी नं. 2 व 3 यांनी फिर्यादी निशांत सनकाले  रा. डोबिवली, पुर्व ठाणे यांना मारहाण करून सदर फेरोनिओबियम धातुने भरलेल्या गोण्या जबरीने फिर्यादीच्या ताब्यातून खेचून पळून गेले. गुन्ह्यातील फेरोनिओबियम धातुचे 250 किलो ग्रॅम वजनाचे तुकडे प्रती किलो 2500 रुपये असा एकुण 6 लाख 25000 रुपये किमतीचा माल पोलिसांनी हस्तगत केला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे. याबाबत वडखळ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply