महाडच्या डॉ. आंबेडकर महाविद्यालयात पुन्हा राडा

दोन गटांत हाणामारी; सहा जखमी

महाड : प्रतिनिधी
येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात गेली अनेक वर्षे सुरू असलेला प्राचार्यपदाचा वाद गुरुवारी (दि. 26) पुन्हा उफाळून आला. दोन दिवसांपूर्वी प्राचार्य सुरेश आठवले यांनी या कॉलेजचा ताबा घेतला होता. त्यामुळे चिडलेल्या प्राचार्य धनाजी गुरव यांनी गुरुवारी सकाळी प्राचार्य आठवले यांना बेदम मारहाण केली. शिवाय महाविद्यालयातील साहित्याचीही तोडफोड केली. या हाणामारीत आठवले गटातील सहा जण जखमी झाले आहेत.
पीपल्स एजुकेशन संस्थेच्या महाडमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात गेली अनेक वर्षे प्राचार्यपदाचा वाद सुरू आहे. महाविद्यालयाचा ताबा घेण्यावरून यापूर्वीही अनेक वेळा दोन गटांत वाद झाला होता. दोन दिवसांपूर्वी या कॉलेजचा ताबा सुरेश आठवले यांनी घेतला होता. गुरुवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास धनाजी गुरव यांनी महाविद्यालयात येऊन आठवले आणि अन्य पाच जणांना लाठ्या काठ्या आणि लोखंडी रॉडच्या साहाय्याने बेदम मारहाण केली. त्यात सुरेश आठवले यांसह महेंद्र घारे, अरविंद साळवी, विठ्ठल गायकवाड, संजय हाटे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना प्रथम महाडमधील ट्रामा केअरमध्ये दाखल करण्यात आले होते, मात्र अधिक उपचाराकरिता शहरातील एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. या घटनेनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
या प्रकरणी प्राचार्य धनाजी गुरव, डॅनिअल शिवराम सोनावणे (रा. मुंबई), कल्पेश सुधीर जाधव, अनिल विष्णू जाधव (रा. कुंभारवाडा-विन्हेरे) यांना पोलिसांनी अधिक चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे, मात्र रात्री उशिरापर्यंत कुणावरही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.

Check Also

Как использовать аналитические функции на 1xbet зеркало

Как использовать аналитические функции на 1xbet зеркало Аналитические функции на платформе 1xbet зеркало предоставляют пользователям …

Leave a Reply