Friday , June 9 2023
Breaking News

रायगडात राष्ट्रवादीला मोठा धक्का

सुधागड़ातील शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

पाली ः प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. जांभूळपाडा येथे पार पडलेल्या कार्यक्रमात सुधागड तालुक्यातील जांभूळपाडा जिल्हा परिषद गटातील जांभूळपाडा, माणगाव बुद्रुक, दहिगाव, चिवे, खांडपोली, नवघर आदी सहा ग्रामपंचायतीतील सरपंच, उपसरपंच, सदस्य व इतर पक्षाचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपत जाहीर प्रवेश केला. सर्व प्रवेशकर्त्यांचे माजी मंत्री तथा आमदार रविशेठ पाटील, माजी आमदार धैर्यशील पाटील, युवा नेते वैकुंठ पाटील, भाजप जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा, भाजप नेत्या गीता पालरेचा, सुधागड तालुका अध्यक्ष चंद्रकांत घोसाळकर आदींनी स्वागत केले. या वेळी आमदार रविशेठ पाटील यांनी, देशाचे नेतृत्व नरेंद्र मोदी यांच्याकडे असून त्यांचे काम वाखाणण्याजोगी आहे. देशावर आलेल्या कोरोनासारख्या महासंकटावर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मात करण्यात आली. शेतकर्‍यासह विविध घटकाला न्याय देण्याचे काम भाजप करीत आहे. राज्य व देशाचा विकास भाजप पक्षच करू शकतो, त्यामुळे मतभेद व मनभेद विसरून एकदिलाने काम करा, भाजप संघटनेला बळ द्या. सुधागड तालुक्याच्या सर्वांगीण व शाश्वत विकासासाठी भाजपच्या माध्यमातून भरीव निधी उपलब्ध केला जात आहे. यापुढेही पेण सुधागड मतदारसंघात निधी कमी पडणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली. माजी आमदार धैर्यशील पाटील म्हणाले की, भाजपच्या काळात या योजना गोरगरीब सर्वसामान्य तळागाळातील लाभार्थी जनतेपर्यंत पोहचत आहेत. आपणही याच घटकांच्या उत्कर्षासाठी काम करतोय, त्यामुळे आपण भाजपमध्ये प्रवेश केल्याचे स्पष्ट केले. गीता पालरेचा म्हणाल्या, सुधागडातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा ओघ भाजपकडे आहे. माझ्यावर विश्वास ठेवून मोठ्या संख्येने कार्यकर्ते भाजप पक्षात दाखल होत आहेत, याचे समाधान व्यक्त करून गीताताई पालरेचा यांनी सर्वांचे आभार मानले. या पक्ष प्रवेशाने सुधागड पेण रोहा मतदारसंघात भाजपची संघटनात्मक ताकद वाढली आहे. या पक्षप्रवेशाने गीताताई पालरेचा यांचा करिष्मा सिद्ध झाला असून भविष्याच्या काळात हा झंजावत असाच सुरू राहिल्यास भाजपचे कमळ अधिक जोमाने खुलणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. या वेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा, आलाप मेहतारमेश साळुंके, यशवंत पालवे, जे. बी. गोळे, जांभुळ पाडा ग्रामपंचायत सरपंच श्रद्धा कानडे, गणेश कानडे, विकास माने, केतन देसाई, आलाप मेहता, बळीराम जाधव, विठ्ठल सिंदकर, सुरेश धनवी, महेश गिरी, अमोल देसाई , सागर मोरे , हरीचंद्र पाटील आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर शांतता कमिटीची बैठक

पनवेल : वार्ताहर सध्या महाराष्ट्रात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व स्टेटस वायरल होत असल्याने हिंदुत्ववादी …

Leave a Reply