Saturday , December 3 2022

देवकान्हेतील असंख्य ग्रामस्थ गुरुवारी करणार भाजपमध्ये प्रवेश

धाटाव ः प्रतिनिधी

रोहा तालुक्यातील देवकान्हे येथील असंख्य ग्रामस्थ भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश करणार आहेत. देवकान्हे येथे गुरुवारी (दि. 26) सांयकाळी 5 वाजता हा पक्षप्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला आहे. भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष तथा पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, माजी मंत्री तथा पेण मतदारसंघाचे आमदार रविशेठ पाटील आणि भाजप दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष महेश मोहिते यांच्या प्रमुख उपस्थितीत, तर युवा मोर्चाचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अमित घाग यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे. या सोहळ्यास जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थितीत राहणार आहेत.

Check Also

राजिपकडून जनतेला मिळणार महत्त्वपूर्ण ऑनलाइन सुविधा

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्हा परिषद (राजिप) प्रशासनाच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने नागरिकांना घरबसल्या कशा सुविधा …

Leave a Reply