Breaking News

तापमानात वाढ झाल्याने काळजी घेण्याचे आवाहन

पनवेल ः रामप्रहर वृत्त
कोकण विभागातील तापमानात वाढ झाल्याने उष्माघाताचे प्रमाण वाढले आहे. उष्णतेच्या ताटेमुळे होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी नागरिकांनी दुपारच्या वेळी अनावश्यक घराबाहेर पडू नये. आपली आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे. बाहेरचे तापमान प्रमाणाबाहेर वाढले की, शरीरातील तापमान नियंत्रित करण्याची यंत्रणा कोलमडते. उष्माघात झाल्यावर चक्कर येणे, मळमळ, उलट्या होणे, डोकेदुखी, दरदरून घाम फुटणे, थकवा येणे स्नायूंना आकडी येणे अशी लक्षणे दिसू लागताच जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क करावा. उष्माघात होऊ नये म्हणून तहान लागलेली नसली तरीसुध्दा जास्तीत जास्त पाणी पिण्यात प्यावे, हलकी, पातळ व सच्छिंद्र सुती कपडे वापरावेत, बाहेर जातांना गॉगल्स, छत्री/ टोपी, बूट व चपलाचा वापर करण्यात यावा, प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत ठेवावी. कोंकणातील जनतेने काळजी घ्यावी. उन्हाळ्यात त्रास होऊ लागल्यास जवळच्या शासकीय जिल्हा रुग्णालय अथवा तालुका किंवा प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क करावा. अनेक आरोग्य केंद्रात उष्णतेचा त्रास होणार्‍या रुग्णांसाठी स्वतंत्र कक्षाची सोय करण्यात आली आहे.

थंड पेय, फळांना वाढती मागणी

गेल्या आठवडाभरापासून पनवेल शहर आणि परिसरातील तापमान कमालीचे वाढल्याने सारेच हैराण झाल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात शरीराला गारवा मिळावा म्हणून आता थंड पेयांना मागणी वाढली आहे. आरोग्यपूरक फळांनाही आता चांगला भाव आलेला आहे. ठिकठिकाणी गल्लोगल्लीत बर्फाचे गोळे विक्रेते फिरताना दिसत आहेत. बाजारात लिंबांनाही चांगला भाव आलेला आहे. याशिवाय थंडगार सब्जाही विकला जात आहे. बाजारात द्राक्षे, कलिंगडांनाही ग्राहकांची पसंती मिळत आहे. रसवंतीगृहातही गर्दी होत आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply