Breaking News

पनवेलमधील शिवकर, मोहो, पाली येथे रस्ते कामाचा शुभारंभ

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त
भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष व पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्न व पाठपुराव्यामुळे शिवकर, मोहो, पाली येथील रस्त्यांच्या कामांसाठी शासनाकडून निधी उपलब्ध झाला असून या कामांचे भूमिपूजन सोमवारी (दि. 17) भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आले.
राज्य शासनाच्या ग्रामविकास विभाग अनुसूची 2515-1238 अंतर्गत शिवकर ते मोहा रस्ता डांबरीकरण करणे (20 लाख खर्च) तसेच मोहो ते मोहो पाडा (15 लाख) व पाली गाव ते पाली स्मशानभूमी (15 लाख खर्च) रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. या कामांचा शुभारंभ भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते झाला.
या कार्यक्रमास भाजप तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, भूपेंद्र पाटील, पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, वांगणी तर्फे वाजे अध्यक्ष सुनील पाटील, शिवकर सरपंच आनंद ढवळे, माजी उपसरपंच तुकाराम टोपले, भाजप गाव अध्यक्ष माया पाटील, युवा कार्यकर्ते शुभ पाटील, हरिश्चंद्र ढवळे, जगदीश ढवळे, शिवकर ग्रामपंचायत सदस्य मंगेश ढवळे, रवींद्र ढवळे, मनीषा ढवळे, रेश्मा पाटील, प्रांजल पाटील ग्रामसेवक सचिन पाटील, प्रवीण म्हात्रे, संतोष शेळके, प्रकाश म्हात्रे, गुरूनाथ भोईर, चेतन शेळके, जयेश पाटील आदी पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.

Check Also

Positive aspekte Bei Freispielen Frei Einzahlung Fur Bestandskunden Freispiele exklusive Einzahlung vorschlag je Bestandskunden enorme Vorteile

Welche vertiefen auf keinen fall doch nachfolgende Spielerbindung, zugunsten offenstehen zweite geige zusatzliche Wege, abzuglich …

Leave a Reply