Breaking News

दक्षिण आशियाई फेडरेशन गेम्स टेबल टेनिस आणि राष्ट्रीय स्पर्धेत स्वस्तिका घोषची सुवर्ण कामगिरी

लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले अभिनंदन

पनवेल : प्रतिनिधी

मानाच्या दक्षिण आशियाई फेडरेशन गेम्स टेबल टेनिस स्पर्धेत सीकेटी महाविद्यालयाची विद्यार्थिनी व टेबल टेनिसपटू स्वस्तिका घोष हिने सांघिक सुर्वण पदक तर राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत रजत पदक पटकावित पुन्हा एकदा दैदिप्यमान कामगिरी केली असून त्याबद्दल जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी तिचा आज (दि. १३) सत्कार केला. यावेळी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, स्वस्तिकाचे वडील व प्रशिक्षक संदीप घोष आदी उपस्थित होते.  जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुलमध्ये स्वस्तिकाने इयत्ता तिसरी ते बारावी पर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर आता ती खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालयात (स्वायत्त) बीएमएसचे प्रथम वर्षाचे शिक्षण घेत आहे. स्वस्तिकाने देशात व परदेशात झालेल्या टेबलटेनिस स्पर्धेत चमकदारी कामगिरी करीत देशाचे नाव उंचाविले आहे.  स्वस्तिकाने लहानपणापासून टेबलटेनिस खेळात आपली आवड व नैपुण्य दाखविले आहे. मालदीव येथे दिनांक ९ ते ११ मे दरम्यान १९ वर्षांखालील दक्षिण आशियाई फेडरेशन चॅम्पियन स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, नेपाळ, मालदीव, भूतान, बांगलादेश आणि श्रीलंका आदी देशातील संघाचा सहभाग होता. या स्पर्धेत सांघिक गटात स्वस्तिका घोष हिच्यावर भारतीय संघाची कर्णधार म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली होती. यावेळी सर्वोत्कृष्ट कामगिरी करत भारतीय संघाने सांघिक सुवर्णपदक पटकाविले. तसेच शिलाँग येथे झालेल्या ८३ व्या राष्ट्रीय टेबल टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धेत रजत पटकाविले. त्याचबरोबर युकेमध्ये जुलै महिन्यात कॉमनवेल्थ गेम्स स्पर्धा होणार असून देशात चौथ्या क्रमांकावर असलेल्या स्वस्तिका घोषची २५ ते ३० मे  पर्यंत होणाऱ्या टॉप ८ कॅम्प साठी निवड झाली आहे.

Check Also

कामोठ्यात शनिवारी ’मा. श्री. परेश ठाकूर केसरी’ भव्य कुस्त्यांचे जंगी सामने

पैलवान देवा थापा आणि नवीन चौहान यांची बिग शो मॅच होणार पनवेल ः रामप्रहर वृत्त …

Leave a Reply