Breaking News

आमदार राजन साळवी यांची सहकुटुंब चौकशी

अलिबाग : प्रतिनिधी
उद्धव ठाकरे गटाचे राजापूरचे आमदार राजन साळवी यांची मंगळवारी (दि. 18) अलिबाग येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) कार्यालयात सहकुटुंब चौकशी करण्यात आली. त्यांची बुधवारी (दि. 19)देखील चौकशी केली जाणार आहे.
बेनामी मालमत्ता जमविल्याप्रकरणी आमदार साळवी यांची मागील काही महिन्यांपासून साळवी यांची एसीबीकडून चौकशी सुरू आहे. यापूर्वी साळवी हे चार वेळा चौकशीसाठी हजर राहिले होते. त्यांचे स्वीय सहाय्यक मालप यांचीदेखील चौकशी करण्यात आली आहे. एसीबीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहकार्याने त्यांचे राहते घर आणि रत्नागिरीतील हॉटेलचे मूल्यांकन केलेलेे आहे.
एसीबीने साळवी यांच्यासह त्यांच्या कुटुंबालाही चौकशीसाठी पाचारण केले होते. मध्यंतरीच्या काळात एसीबी कार्यालयातील अधिकार्‍यांच्या बदल्यांमुळे ही चौकशी लांबली. आता ती पुन्हा सुरू झाली आहे. मंगळवारी स्वतः राजन साळवी, त्यांच्या पत्नी अनुजा, दोन मुले शुभम आणि अथर्व, भाऊ दीपक साळवी, सीए श्रीरंग वैद्य सकाळी 11 वाजता चौकशीसाठी एसीबी कार्यालयात पोहचले. या सर्वांची चौकशी करण्यात आली असून बुधवारी सलग दुसर्‍या दिवशी चौकशी होणार आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply