Breaking News

नेरळमध्ये नळ पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन

कर्जत ः प्रतिनिधी
नेरळ शहराची लोकसंख्या वाढत आहे. त्यामुळे नेरळसाठी तब्बल 40 कोटी रुपये खर्चाची नवी पाणीपुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून राबवली जात आहे. या योजनेचे भूमिपूजन भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते रविवारी (दि. 23) करण्यात आले. नेरळ मोहचीवाडी येथील पाण्याच्या टाकीजवळ झालेल्या या कार्यक्रमास सरपंच उषा पारधी, उपसरपंच तथा भाजप तालुकाध्यक्ष मंगेश म्हसकर, सदस्य शिवाली पोतदार, गीतांजली देशमुख, उमा खडे, श्रद्धा कराळे, जयश्री मानकामे, रेणुका चंचे, धर्मानंद गायकवाड, संतोष शिंगाडे, माजी सभापती अमर मिसाळ, माजी सरपंच जान्हवी साळुंके, शिवसेना शहराध्यक्ष प्रभाकर देशमुख, भाजप शहराध्यक्ष अरुण नाईक, माथेरानचे प्रवीण सकपाळ, विवेक चौधरी, महिला अध्यक्ष नम्रता कांदळगावकर, तालुका संघटक अंकुश दाभणे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपअभियंता एन. पी. जगताप आदी उपस्थित होते. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, नेरळमध्ये लोकसंख्या वाढत असल्याने पाणी योजनेची गरज लक्षात घेऊन आमदार महेंद्र थोरवे यांनी पाणीपुरवठा योजना मंजूर करून घेतली. एका शहराच्या तोडीची ही योजना आहे. आपल्या मतदारसंघातील ग्रामीण भागासह शहरात लोकांना पिण्यासाठी पाणी मिळावे, चांगले रस्ते यासाठी आमदार थोरवे हे कायम आग्रही आहेत. आमदार महेंद्र थोरवे म्हणाले की, संपूर्ण तालुक्यात जल जीवन मिशनच्या माध्यमातून पाणी योजना सुरू केल्या असून हर घर नल हर घर जल हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिलेले स्वप्न सत्यात उतरवत आहोत. नेरळ ग्रामपंचायत नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी कायम झटत असते. ही पाणी योजना नेरळला नवसंजीवनी ठरेल हे निश्चित असले तरी अनेक प्रश्न आजही प्रलंबित आहेत. ते सोडविण्यासाठी आणि नेरळच्या विकासासाठी आता ग्रामपंचायतीचे हात तोकडे पडत आहेत. तेव्हा नेरळ ग्रामपंचायतीची लवकरच नगरपंचायत व्हावी यासाठी दोन्ही आमदारांनी प्रयत्न करावे, अशी मागणी या वेळी उपसरपंच मंगेश म्हसकर यांनी केली.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply