Breaking News

फुंडे हायस्कूलमध्ये शिक्षक दिन साजरा

पनवेल ः रामप्रहर वृत्त

रयत शिक्षण संस्थेचे तु. ह. वाजेकर उच्च माध्यमिक विद्यालय फुंडे येथे शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

विद्यालयाचे चेअरमन कृष्णाजी कडू, प्राचार्य एम. एच. पाटील, उपमुख्याध्यापक खाडे, पर्यवेक्षिका ए. ए. मांडवकर, जी. सी. गोडगे व अन्य मान्यवरांच्या तसेच एक दिवसीय विद्यार्थी अधिकारी वर्गाच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमधून प्राचार्य म्हणून सुरज म्हस्के, उपमुख्याध्यापक म्हणून ऋषिकेश मालोकार, पर्यवेक्षक म्हणून प्रथमेश गडदे आणि सृष्टी पाटील यांनी अधिकारी वर्गाची भूमिका पार पाडली. तर चेअरमन म्हणून कामाजी अनकारे याने कार्यभार सांभाळला. विद्यार्थी शिक्षकामधून उज्ज्वला बुरंगे आणि  हर्षाली पारवे  यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयुष शिंदे याने तर आभार प्रदर्शन अमृता जाधव हिने केले. सांस्कृतिक विभागप्रमुख  एच. एन. पाटील आणि सहाय्यक एस. डी. म्हात्रे यांनी सर्व शालेय अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे नियोजन केले होते.

Check Also

तीनही निवडणूक आयुक्तांच्या पत्रकार परिषदेमुळे राहुल गांधींचा फेक नॅरेटिव्ह उद्ध्वस्त!

‌‘वोटचोरी‌’चा आरोप करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे; आमदार प्रशांत ठाकूर यांचा विरोधकांवर घणाघात पनवेल : रामप्रहर वृत्ततीनही …

Leave a Reply