सांगली ः रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेचे सांगली जिल्ह्याच्या तासगाव तालुक्यातील विसापूर राजमित्र रामचंद्र शामराव माने-पाटील विद्यामंदिर व विज्ञान (कृषी) ज्युनिअर या ठिकाणी विद्यालयाच्या नवीन इमारतीचा उद्घाटन व मुख्याध्यापक एस. एम. मुलाणी यांचा सेवानिवृत्ती सत्कार असा संयुक्त समारंभ शनिवारी (दि. 22) झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन अनिल पाटील, तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर उपस्थित होते. या कार्यक्रम रयत शिक्षण संस्थेच्या दक्षिण विभागाचे चेअरमन माधवराव (दादा) मोहिते, जनरल बॉडी सदस्य सरोज (माई) पाटील, अजित सूर्यवंशी, हेमादेवी शिवाजी पाटील, वाय. टी. देशमुख, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य एम. बी. शेख, जे. के. जाधव, वसंत सावंत, सहसचिव डॉ. शिवलिंग मेनकुदळे, सहसचिव राजेंद्र साळुंखे, प्राचार्य राजेंद्र मोरे, विभागीय अधिकारी विनयकुमार हणशी, स्कूल कमिटी सदस्य सुनील पाटील, पतंग माने, बळवंत चव्हाण, भगवान माने, जिल्हा परिषद सदस्य अर्जुन पाटील, सरपंच अशोक मोहिते, उपसरपंच अशोक अमृतसागर, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. या वेळी मान्यवरांनी विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून विद्यालयाच्या इमारतीसाठी देणगी दिलेल्या नागरिकांचा संस्थेेचे चेअरमन अनिल पाटील आणि लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक संस्थेचे सचिव श्री विठ्ठल शिवणकर यांनी, सूत्रसंचालन सी. डी. खोत व कुलकर्णी मॅडम यांनी केले, तर उपस्थितांचे आभार व्ही. ए. पाटील यांनी मानले.