Monday , October 2 2023
Breaking News

श्रीवर्धनमध्ये रस्ते कामाचा शुभारंभ; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार धैर्यशील पाटील यांची प्रमुख उपस्थिती

श्रीवर्धन : प्रतिनिधी
श्रीवर्धन तालुक्यातील हुनरवेली, शिरवणे, काळींजे आणि कोंडिवली येथे जिल्हा नियोजन विकास निधीतून रस्ते कामांचा शुभारंभ भारतीय जनता पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व माजी आमदार धैर्यशील पाटील यांच्या हस्ते शनिवारी (दि. 13) झाला. या दरम्यान हुनरवेली व शिरवणे येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.
या कार्यक्रमांना भाजप कोकण विस्तारक अविनाश कोळी, माजी आमदार तुकाराम सुर्वे, जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील, प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजेश मपारा, युवा मोर्चा दक्षिण रायगड अध्यक्ष अमित घाग, भाजप रोहा तालुका अध्यक्ष सोपान जांबेकर, श्रीवर्धन तालुका अध्यक्ष प्रशांत शिंदे, म्हसळा तालुका अध्यक्ष प्रकाश रायकर, सरपंच प्रचिती घडसे, उपसरपंच मंगेश खैरे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

 लोकनेते दि.बा.पाटील नामकरण कृती समितीतर्फे सर्व आजी माजी आमदारांची लवकरच बैठक

पनवेल : प्रतिनिधी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्याचा विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात …

Leave a Reply