टोकियो ः वृत्तसंस्था
कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर टोकियो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी जपान हे सुरक्षित ठिकाण नाही, अशा शब्दांत वैद्यकीय तज्ज्ञांनी संयोजकांना धोक्याचा इशारा दिला आहे. ऑलिम्पिक स्पर्धा चार महिन्यांवर आली असताना संयोजन समितीने जोखमीची तीव्रता कमी केल्याचा दावा केला आहे, परंतु वैद्यकीय तज्ज्ञांचे मात्र समाधान झालेले नाही. कोरोनाच्या जोखमीचे आव्हान पाहता ऑलिम्पिकचे आयोजन न करणेच योग्य ठरेल. कारण जपानमधील परिस्थितीत धोकादायक आहे, असे योकोहामा इस्पितळाचे प्रख्यात संसर्गरोग तज्ज्ञ डॉ. नोरिओ सुगाया यांनी म्हटलेय. ‘ऑलिम्पिचे सुरक्षितपणे आयोजन करण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांचे 50-70 टक्के लसीकरण आवयश्यक आहे, परंतु सध्या तरी देशात चालू असलेल्या धिम्या लसीकरण प्रक्रियेमुळे हे लक्ष्य पेलता येणार नाही,’ असेही सुगाया म्हणाले.