Breaking News

नवीन पनवेलमधील नागरी समस्या मार्गी

पावसाळापूर्व गटार, नालेसफाई कामांना मनपाकडून सुरुवात; मनोज भुजबळ यांच्या मागणीला यश

पनवेल : वार्ताहर
पनवेल महापालिका क्षेत्रातील प्रभाग 17 मधील नविन पनवेल सेक्टर 13 येथील ए टाईप मधील वसाहतीमधील गटारांची साफसफाई व दुरुस्ती पावसाळापुर्वी करून देण्याची पनवेल महापालिकेचे माजी बांधकाम सभापती मनोज भुजबळ यांनी पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. त्यानुसार या कामांना सुरुवात झाली आहे.
यासंदर्भात मनोज भुजबळ यांनी आयुक्त गणेश देशमुख यांना दिलेल्या निवेदनात म्हटले होती की, प्रभाग 17 मधील नवीन पनवेलमधील सेक्टर 13 येथील ए टाईप ही नव्या घरांची वसाहत सिडकोने बांधलेली असून सदर वसाहतीमध्ये दरवर्षी पावसाळ्यात पाणी घरात भरते. अशा परिस्थितीत संपूर्ण गटारे ही वर्षानुवर्षे गटाराचे पाणी, पावसाचे तुंबणारे पाणी आणि उंदीर घुशींच्या उकरण्याणे ए टाईप मधील सर्वच गटारे फुटलेली आहेत. त्यामुळे या गटारांतील खराब पाण्याच्या निचरा मोठ्या गटारात होत नाही.
खराब पाणी जागो जागी साचते व ते पाणी घराखालील पायांमध्ये मुरते त्यामुळे तेथील घरांनादेखील धोका निर्माण होऊन प्रचंड दुर्गंधीसुद्धा येते. परिणामी तेथील रहिवाश्यांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण होऊन रोगराई वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रभाग 17 मधील ए टाईप वसाहतीमधील गटारांची साफसफाई व दुरुस्ती पावसाळया पुर्वी करून द्यावी, अशी मागणी मनोज भुजबळ यांनी महापालिकेकडे केली होती. या मागणीची दखल घेत शुक्रवारपासून काम सुरू करण्यात आले.

Check Also

केळवणे येथे आमदार महेश बालदींच्या प्रचाराचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष केळवणे येथे उरण मतदार संघाचे दमदार आमदार महेश …

Leave a Reply