Breaking News

सेझग्रस्त शेतकर्‍यांच्या जमिनी परत करा; भाजप नेत्यांची मागणी

मुंबई : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यातील विशेष आर्थिक क्षेत्र (सेझ) प्रकल्पाकरिता संपादित केलेल्या शेतकर्‍यांच्या जमिनीवर मुदतीनंतरही प्रकल्पाची उभारणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे या जमिनी शेतकर्‍यांना परत करण्यात याव्यात, अशी मागणी भाजप आमदार रविशेठ पाटील व माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे केली. या मागणीस मंत्रीमहोदयांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
रायगडातील पेण, पनवेल व उरणमध्ये सेझ प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनीबाबत चर्चा करण्याकरिता महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या मंत्रालयीन दालनात मंगळवारी (दि. 23) बैठक आयोजित करण्यात आली होती.
या वेळी भाजप आमदार रविशेठ पाटील व माजी आमदार धैर्यशील पाटील म्हणाले की, शेतकर्‍यांकडून सेझ प्रकल्पासाठी घेण्यात आलेली सुमारे साडेतीन हजार एकर जमीन 15 वर्षांनंतर तशीच पडून आहे. मुदतीनंतरही या जमिनीवर प्रकल्पाची उभारणी करण्यात आली नसल्याने संपादित केलेल्या जमिनी शेतकर्‍यांना परत कराव्यात.
यावर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देत शेतकर्‍यांच्या जमिनी त्यांना परत हव्यात या भावनेशी आम्ही सहमत आहोत. त्यांना त्यांच्या जमिनी देण्याचीसुद्धा आमची इच्छा आहे. त्यासाठी जी काही योग्य कार्यवाही करावी लागेल ती केली जाईल, असे आश्वासित केले.
या बैठकीस आमदार जयंत पाटील, रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे आणि शेतकरी उपस्थित होते.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply