Breaking News

खोपोलीत स्वच्छता कागदावर

कचर्‍याने गटारे तुडुंब भरली तरी प्रशासनाचे दुर्लक्ष

खोपोली : प्रतिनिधी
खोपोली नगरपालिकेकडून स्वच्छता सर्वेक्षण अभियाना अंतर्गत सर्वत्र भिंती रंगवून स्वच्छतेचा संदेश दिला जात आहे. भिंती रंगविण्यात लाखो रुपये खर्च होत असून, मात्र शहरातील स्वच्छता वार्‍यावर असल्याचे चित्र आहे. नगरपालिका क्षेत्रातील बहुसंख्य गटारे, नैसर्गिक नाले कचरा व गवताने तुडुंब भरली असून, सांडपाणी निचरा होत नसल्याने डास व मच्छरांनी नागरिक हैराण झाले आहेत. प्रशासनाला याकडे लक्ष देण्यास वेळ नसून, भिंती रंगवून स्वच्छता संदेश दिले म्हणजे स्वच्छता असे अनोखे सर्वेक्षण अभियान शहरात राबविण्यात येत आहे.
स्वच्छता अभियान अंतर्गत लाखो रुपये निधी खर्च होत आहे. मात्र स्वच्छता बाबत नागरिकांना हव्या त्या मूलभूत गरजा व सुविधा देण्याकडे प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. रहिवासी सोसायटया, बैठया वसाहती, सार्वजनिक गटारी व नैसर्गिक नाल्यांची स्थिती भयानक आहे. गवत, कचरा व प्लास्टिक बाटल्यांनी गटारे आणि नाले भरले आहेत. अनेक गटारे तुटलेल्या असून, सांडपाणी रस्त्यावर येत आहे. मात्र दुसरीकडे स्वच्छता संदेश व भिंती रंगविण्यात पालिका प्रशासन व्यस्त आहे.

टप्याटप्याने सर्व परिसरात पावसाळी पूर्व गटारी व नाले सफाईची कामे होत आहेत. यासाठी विशेष पथक बनविण्यात आले असून, दोन वरिष्ठ अधिकारी याकामी नेमण्यात आले आहेत.
-अनुप दुरे पाटील, मुख्याधिकारी खोपोली

महिनोंमहिने गटारे साफ केल्या जात नाहीत. वीज वितरण कडून तोडण्यात आलेली झाडांच्या फांद्या महिना झाला तरी तशाच गटारांमध्ये पडून आहेत.
-सुहास सेलूकर, रहिवासी खोपोली

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply