पनवेल : रामप्रहर वृत्त मिडलक्लास सोसायटीच्या मैदानावर सुरू असलेल्या टीआयपीएल ज्युनिअर पनवेल प्रीमियर लीगच्या पहिल्या सामन्यात रॉकविले फायटर संघाने विजयी सलामी दिली, तर दुपारच्या सामन्यात मॉर्निंग पंटर्स संघाने विजय मिळविला. सलामीचा सामना प्रतिक क्रिकेट अकॅडमी विरुद्ध रॉकविले फाइटर असा रंगला. प्रतिक अकॅडमीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारत 179 धावा केल्या होत्या. या संघाकडून पार्थ पवारने 84 धावांची खेळी केली. आव्हानाचा पाठलाग करताना रॉकविले फायटरने शेवटच्या षटकात 181 धावा फलकावर लावत सामना जिंकला. रॉकेविले फायटरकडून धीरेन गोवारी (79) आणि ओमप्रकाश (44) यांनी उत्तम खेळी केली. दुपारच्या सत्रात मॉर्निंग पंटर्स विरुद्ध न्यू पनवेल वॉरियर यांच्यात सामना झाला. मॉर्निंग पंटर्सने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण निवडले. न्यू पनवेल वॉरियरने प्रथम फलंदाजी करताना 196 धावा केल्या होत्या. त्यांच्याकडून अर्णव पाचकुडेने 54 धावा केल्या. आव्हानाचा पाठलाग करताना मॉर्निंग पंटर्सच्या निलेश सावंतने नाबाद 97 धावांची खेळी करून संघाला सामना जिंकवून दिला. तोच सामनावीर किताबाचा मानकरी ठरला.
Check Also
पनवेल महापालिकेच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन
मालमत्ता करावरील शास्ती माफ -आमदार प्रशांत ठाकूर पनवेल ः रामप्रहर वृत्त फोरम, फेडरेशन यांच्या दिशाभूलीमुळे …