उलवे नोड : रामप्रहर वृत्त
आबालवृद्धांचे आकर्षण असलेल्या पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी येथील रामबाग या उद्यानाचा पहिला वर्धापन दिन सोहळा येत्या शुक्रवारी (दि.22) आहे. यानिमित्त श्री सत्यनारायणाची महापूजा आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
दुबईतील मिरॅकल गार्डनच्या धर्तीवर न्हावेखाडी येथील श्री म्हसेश्वर मंदिर परिसरात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या संकल्पनेतून रामबाग साकारली आहे. या उद्यानाच्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा आणि रात्री 8 वाजता वीरभूमी इंटरटेंमेंट (घणसोलीकर) प्रस्तुत 70 कलाकारांचा संच पारंपरिक आगरी-कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम सादर करणार आहे.
या वेळी माजी खासदार संजीव नाईक, आमदार रविशेठ पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली होणार्या या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन श्री म्हसेश्वर मंदिर कमिटीचे अध्यक्ष सी.एल. ठाकूर आणि रामबाग व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष सागर ठाकूर यांनी केले आहे.
Check Also
कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये
पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …