Sunday , February 5 2023
Breaking News

अर्जेंटिनाची चिलीशी बरोबरी

कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा

रिओ दी जानिरो ः वृत्तसंस्था
लिओनेल मेसी याने फ्री-किकवर शानदार गोल झळकावल्यानंतरही अर्जेटिनाला कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात चिलीविरुद्ध बरोबरी पत्करावी लागली. या सामन्यात महान फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांना आदरांजली वाहण्यात आली.
पहिल्या सत्रात मेसीने फ्री-किकवर डाव्या पायाने मारलेला फटका चिलीच्या बचावपटूंच्या डोक्यावरून जात गोलरक्षक क्लॉडियो ब्राव्होने तो अडवण्याचा प्रयत्न केला, पण ब्राव्होने डाव्या बाजुला हवेत झेप घेतल्यानंतरही चेंडू त्याच्या बोटांना स्पर्श करून थेट गोलजाळ्यात गेला. विशेष म्हणजे विश्वचषकाच्या पात्रता फेरीत ब्राव्होने मेसीची फ्री-किक अडवली होती. मेसीने 25 मीटरवरून केलेल्या या अप्रतिम गोलमुळे अर्जेटिनाने 33व्या मिनिटाला 1-0 अशी आघाडी घेतली, पण एडवाडरे वर्गास याने 57व्या मिनिटाला चिलीला बरोबरी साधून दिली. 57व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीवर आर्टुरो विदालने मारलेला फटका इमिलियानो मार्टिनेझ याने अडवल्यानंतर वर्गासने परतीच्या फटक्यावर गोल झळकावला.
अर्जेटिनाने 16व्या आणि 18व्या मिनिटाला गोल करण्याच्या संधी दवडल्या. लोटारो मार्टिनेझ आणि निकोलस गोंझालेझ यांना गोल करण्यात अपयश आले. त्यानंतर मेसीने अर्जेटिनाचे खाते खोलले. आघाडीवीर अ‍ॅलेक्सिस सांचेझच्या अनुपस्थितीत खेळणार्‍या चिलीने दुसर्‍या सत्रात आक्रमक खेळ करण्याचा प्रयत्न केला. त्याचमुळे त्यांना पेनल्टी मिळाली. मेसीने अखेरच्या क्षणी गोल करण्याच्या संधी निर्माण केल्या, पण त्यांना चेंडूला गोलजाळ्यात पोहचवण्यात अपयश आले.

Check Also

कामोठ्यातील लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे स्नेहसंमेलन उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल …

Leave a Reply