नवी दिल्ली ः पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकमधील बालाकोटवर चढविलेल्या हवाई हल्ल्यामुळे दोन्ही देशांत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे पाकिस्तानने हवाई हद्द सील केली आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानी हवाई क्षेत्रातून मालवाहतूक करणारे विमान भारतीय हद्दीत आल्याने हवाई दल सतर्क झाले आहे. सुखोई लढाऊ विमानांनी या विमानाला जयपूर विमानतळावर उतरण्यास भाग पाडले. हे विमान जॉर्जियाचे असून, कराचीहून या विमानाने उड्डाण केले होते.
Check Also
बॉबी @५३ वर्षे; आजही तारुण्यात असलेला प्रेमपट
चित्रपट रसिकांच्या पिढ्या ओलांडल्या, बदलल्या. चित्रपट पाहण्याच्या पध्दतीत बदल होत गेले, रेडिओ ते यू ट्यूब …
RamPrahar – The Panvel Daily Paper