Breaking News

देशाच्या प्रगतीमध्ये व्यापार्‍यांची भूमिका महत्त्वाची

भाजप क्लस्टर संयोजक संजय टंडन यांचे प्रतिपादन

पेण ः प्रतिनिधी

अनेक छोट्या-मोठ्या योजनांमुळे सर्वसामान्य माणसाचे जीवनमान उंचावले आहे. नऊ वर्षांत एकही भ्रष्टाचाराचे प्रकरण समोर आलेले नाही. देशाच्या प्रगतीमध्ये व्यापारी वर्गाची भूमिका महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन भाजपचे क्लस्टर संयोजक संजय टंडन यांनी पेण येथे केले.

भाजप महाजनसंपर्क अभियानांतर्गत रायगड जिल्ह्यातील व्यापारी वर्गाचे संमेलन पेण येथे आयोजित करण्यात आले होते. या वेळी भाजप महाराष्ट्रचे उपाध्यक्ष अजित काळसेकर, आमदार रविशेठ पाटील, भाजप रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार धैर्यशील पाटील, माजी नगराध्यक्षा प्रीतम पाटील, राजिप माजी अध्यक्ष नीलिमा पाटील, जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, अविनाश कोळी, सरचिटणीस मिलिंद पाटील, व्यापारी असोसिएशनचे आलाप मेहता आदींसह व्यापारी उपस्थित होते.

संजय टंडन पुढे म्हणाले की, नऊ वर्षांत संपूर्ण भारत डिजिटल झाले आहे. जगातील 46 टक्के डिजिटल पेमेंट भारतीय करतात. छोट्या-छोट्या गावातदेखील डिजिटल व्यवहार होतात हे फक्त पंतप्रधान मोदी यांच्यामुळे शक्य झाले आहे. त्यामुळे त्यांना भारतातील डिजिटल क्रांतीचे जनक म्हटले, तर वावगे ठरणार नाही. दहा वर्षांपूर्वी भारतीय अर्थव्यवस्था जगात 10 क्रमांकावर होती. आज पाचव्या नंबरवर आणण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. नरेंद्र मोदी हे रिपोर्ट कार्ड देणारे पहिले पंतप्रधान आहेत. काँग्रेसच्या काळात सुरू असलेला भ्रष्टाचार संपवला व देशात शांती निर्माण करण्याचे काम मोदी यांनी केले देशात शांतता असल्यावर व्यापार वाढतो भारतातून निर्यात वाढली आहे. रशियाकडून भारतीय रुपयामध्ये कच्चा तेल खरेदी करण्याची हिम्मत फक्त पंतप्रधान मोदी यांच्यात आहे. आज जगातील मोठ्या कंपन्या चीनमधून भारतामध्ये येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नऊ वर्षांच्या कार्यकाळात देशाने शस्त्र निर्मिती केली नाही तर दुसर्‍या देशाला शस्त्र पुरवली जात आहेत. सर्वसामान्य जनतेचा विचार करणारा पंतप्रधान आपल्याला भेटला आहे. मोदी सरकारने सर्वसामान्य माणसाची फक्त काळजी घेतली नाहीतर मोफत रेशनिंग देऊन गरीब जनतेची भूक भगवण्याचा प्रयत्न केला.

आमदार रविशेठ पाटील यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे भवितव्य उज्ज्वल केले असल्याचे मार्गदर्शन करताना म्हटले, तर माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी व्यापारी अनेकांना रोजगार देत असतो. व्यापार्‍यांचे महत्त्व पूर्वापार चालत आलेले आहे असे म्हटले.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply