जेएनपीटी मल्टीपर्पज हॉलमध्ये शनिवारी समारंभ
पनवेल : रामप्रहर वृत्त
सर्वसमावेशक धोरण आणि सक्षम नेतृत्व असलेल्या भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार्यांचा ओढा सातत्याने वाढत आहे. अशाच प्रकारे उरण विधानसभा क्षेत्रातील विविध पक्षांचे कार्यकर्ते विकासाचे ‘कमळ’ हाती घेणार आहेत. हा पक्षप्रवेश समारंभ शनिवारी (दि. 10) जेएनपीटी हॉलमध्ये सायंकाळी 5 वाजता होणार आहे.
या समारंभास भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या वेळी उरण विधानसभा क्षेत्रातील आंबेवाडी, बोरगाव, नांदगाव, आपटा, उरण पूर्व विभागातील उद्धव ठाकरे गट व शेकापचे प्रमुख कार्यकर्ते, सरपंच, सदस्य भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.