Breaking News

पथविक्रता समितीच्या विजयी उमेदवारांनी घेतली आमदार प्रशांंत ठाकूर यांची भेट

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिकेच्या नगर पथविक्रेता समितीच्या सन 2023-24साठी झालेल्या निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांनी भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची त्यांच्या पनवेल येथील निवासस्थानी बुधवारी (दि. 14) भेट घेतली. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
दिनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान अंतर्गत फेरीवाल्यांना सहाय्य या घटकांतर्गत पनवेल महापालिकेच्या नगर पथविक्रेता समितीच्या सन 2023-24साठी निवडणुक नुकतीच झाली.
या निवडणुकीमध्ये इतर मागास प्रवर्गामधून प्रतीक्षा अनिल माळी, विकलांग महिला राखीव प्रवर्गातून अंजू राजू कोळी, सर्वसाधारण महिला राखीव प्रवर्गामधून आशा राजू मोरे विजयी झाले. त्यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांची बुधवारी भेट घेतली. या वेळी माजी नगरसेवक निलेश बावीस्कर, माजी नगरसेविका दर्शना भोईर, भाजप सोशल मीडिया सेलच्या खारघर सहसंयोजिका कांचन बिर्ला, आरपीआयचे शहराध्यक्ष संतोष सोनकांबळे, रितेश खकाळ, रमेश गांधी आदी उपस्थित होते.

Check Also

तब्बल 33 वर्षांपासून फरार असलेला खुनी पती गजाआड

पनवेल : वार्ताहर पत्नीला जिवंत जाळून फरार झालेला आरोपीचा तब्बल 33 वर्षांनंतर छडा लागला आहे. …

Leave a Reply