Breaking News

पनवेलमधील न्हावे येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून रायगड जिल्ह्याचा विकास वेगाने होत आहे. यालाच अनुसरून पनवेल तालुक्यातील न्हावे गावात भाजपच्या पाठपुराव्यामुळे सुमारे 23 लाख रुपयांची विकासकामे होणार आहेत. या कामांचे भूमिपूजन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 15) झाले.
भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अनेक विकासाची कामे पनवेल आणि उरण तालुक्यात होत आहेत. याच अनुषंगाने भाजपच्या पाठपुराव्यामुळे सिडकोच्या अनुदानातून न्हावे येथे नऊ लाख 21 हजार 316 रुपये खर्चून अंतर्गत गटारे व गावचा मुख्य रस्ता दुरुस्ती आणि पेव्हर ब्लॉक बसवण्याचे काम नऊ लाख 33 हजार 438 रुपये खर्चून करण्यात येणार आहे तसेच न्हावे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पालखी परिक्रमेमागे पेवर ब्लॉक बसवण्याचे काम चार लाख 99 हजार 64 रुपये खर्चून करण्यात येणार आहे. या तीनही विकासकामांचे भूमिपूजन भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते झाले.
या विकासकामांच्या भूमिपूजन समारंभास ग्रामपंचायत सरपंच हरिश्चंद्र म्हात्रे, उपसरपंच प्रल्हाद पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रवींद्र पाटील, ग्रामपंचायत सदस्य सागरशेठ ठाकूर, देवेंद्र भोईर, अमृता पाटील, निर्मला ठाकूर, कल्पना घरत, विजया ठाकूर, कार्यकर्ते शैलेश पाटील, दीपक भोईर, किशोर घरत, जय घरत, रवी पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply