Breaking News

आदई येथे नवीन मतदार नोंदणी शिबिर : तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त

भाजप आदई-नेवाळीच्या वतीने नवीन मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन रविवारी (दि. 18) इंद्रपस्त सोसायटी येथे करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आले. सकाळी 10 ते सायंकाळी 6 पर्यंत झालेल्या या शिबिराचा लाभ अनेकांनी घेतला असून त्यांची मतदार नोंदणी या वेळी करण्यात आली. या वेळी पदमाकर शेळके, अनंता पाटील, भाई पाटील, धर्माशेठ काकडे, महादु शेळके, राजेश काकडे, जगदीश शेळके, निलेश पाटील, ज्ञानेश्वर पाटील, राहूल पाटील, रोहीत पाटील, तेजस म्हात्रे, सत्यवान गायकर, सुरज म्हात्रे, सुरज पाटील, आशिष पाटील, सोसायटीचे अध्यक्ष गणेश वाधवानी, सेक्रेटरी प्रशांत डोंगरे, खजिनदार दिजो मेनाचेरी, आनंद वासूरे, सुभाष मस्कर, संदीप कदम, सचिन होवले, भोईर आदी उपस्थित होते.

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply