Breaking News

भाजपतर्फे पनवेलमध्ये विविध कार्यक्रम

महाजनसंपर्क अभियानांतर्गत ज्येष्ठ कार्यकर्ता संमेलन

पनवेल : रामप्रहर वृत्त

देशाचे कार्यकुशल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाली आहेत. या काळात देश विकासाची मोठी पावले उचलतानाच जागतिक स्तरावर भारताची मन उंचाविण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले. त्याअनुषंगाने योजना, विकास कामे, निर्णयांची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी भाजपतर्फे मोदी 9 महाजनसंपर्क अभियानांतर्गत शनिवारी (दि. 17) ज्येष्ठ कार्यकर्ता संमेलन आयोजित करण्यात आले होते. पनवेलमध्ये अशोक गार्डन जवळील तथास्थू हॉलमध्ये हे ज्येष्ठ कार्यकर्ता संमेलन भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झाले. या वेळी बाळासाहेब पाटील, पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, नंदू पटवर्धन, नितीन पाटील, सी. सी भगत, जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, दीपक बेहेरे, माजी उपमहापौर चारुशीला घरत. माजी नगरसेविका रूचिता लोंढे, सुशीला घरत, खारघर मंडळ अध्यक्ष बिजेश पटेल यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते.

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ सभागृहात मन की बातचे प्रक्षेपण

पनवेल : देशाचे लोकप्रिय व कर्तव्यदक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात च्या माध्यमातून देशातील नागरिकांशी संवाद साधला. सन 2023 मधील हा एकूण 102 वा भाग होता पनवेल तालुक्यातील मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ सभागृह येथे रविवारी (दि. 18) थेट प्रक्षेपण आयोजित करण्यात आले होते. या वेळी भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर उरणचे आमदार महेश बालदी, पेणचे माजी आमदार धैर्यशील पाटील, पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, सी. सी. भगत, जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, दीपक बेहेरे, अतुल काळसेकर, सतीश निकम, माजी नगरसेवक प्रकाश बिनेदार, जेष्ठ कार्यकर्ते श्रीरंग पटवर्धन, उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, कामगार संघटना जिल्हा अध्यक्ष जितेंद्र घरत, ओबीसी मोर्चा जिल्हा अध्यक्ष राजेश गायकर, उरण तालुका महिला अध्यक्षा राणी म्हात्रे, योगिता घरत, शिल्पा म्हात्रे, प्रतिभा भोईर, जसीम गॅस यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply