Breaking News

मंत्री मंगलप्रभात लोढा शनिवारी पनवेलमध्ये

पनवेल  : प्रतिनिधी
देशाचे कणखर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारकडून नऊ वर्षांत समाजातील सर्व घटकांसाठी कल्याणकारी कार्य करण्यात आले. त्या अनुषंगाने भाजपतर्फे राबविण्यात येणाऱ्या मोदी @ ९ कार्यक्रमांतर्गत महाजनसंपर्क अभियानाच्या अनुषंगाने पनवेल विधानसभा भाजपच्या वतीने शनिवार दिनांक २४ जून रोजी दुपारी १२ वाजता राज्याचे उद्योजकता व कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली आणि भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत लाभार्थी संमेलन होणार आहे.
तक्का येथील श्री. संत सावता माळी सभागृहात होणाऱ्या या संमेलनास प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष जयंत पगडे, माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील, कामोठे शहर अध्यक्ष रविंद्र जोशी आदी मान्यवरांची उपस्थिती असणार आहे.
मोदी @ ९ कार्यक्रमांतर्गत महाजनसंपर्क अभियानाच्या अनुषंगाने, मोदी सरकारच्या काळात झालेल्या विकास कामांची माहिती देण्यासाठी विकास तिर्थ, डॉक्टर, शिक्षक, वकील, इंजिनिअर यांचे प्रबुद्ध नागरी संमेलन, प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मोदी सरकारला सोशल मीडियाच्या माध्यमातून पाठिंबा देणाऱ्यांचे सोशल मीडिया इन्फ्ल्यून्सर संमेलन, विशाल रॅली, जाहीर सभा, योग दिन, ज्येष्ठ कार्यकर्ता संमेलन, व्यापारी संमेलन, व्हर्च्युअल रॅली, घरोघरी संपर्क अभियान, संयुक्त मोर्चा संमेलन अशी विविध कार्यक्रमे मोठ्या उत्साहात पार पडत आहेत. त्या अनुषंगाने या महाजनसंपर्क अभियानातील लाभार्थी संमेलन एक महत्वाचा कार्यक्रम आहे.

Check Also

सदस्य नोंदणीत प्रत्येकाने सहभाग घ्यावा -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल ः रामप्रहर वृत्त जनतेच्या साक्षीने राज्यात आपल्याला अभूतपूर्व असे यश मिळाले आहे. आता पक्षवाढीसाठी …

Leave a Reply