Breaking News

नवीन पनवेलमध्ये पीएफआय जिंदाबाद मेसेजसह सुतळी बॉम्ब आढळले

पनवेल ः वार्ताहर
दहशतवादी कारवायांशी संबंधित आणि शासनाने बंदी घातलेल्या पीएफआय संघटनेच्या समर्थनार्थ मेसेज लिहून सोबत दोन सुतळी बॉम्ब ठेवल्याचा प्रकार नवीन पनवेलमध्ये समोर आला आहे. खांदेश्वर पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून अज्ञात आरोपीचा शोध सुरू केला आहे.
नवीन पनवेल सेक्टर 19मधील निलांगण सोसायटीतील फ्लॅटच्या दरवाजावर पीएफआय संघटना जिंदाबाद असा मेसेज आणि 786 हा नंबर घराबाहेर लिहिण्यात आला आहे. सोबतच दोन सुतळी बॉम्ब ठेवल्याचे दिसून आले. त्यामुळे रहिवाशांमध्ये घबराट पसरली आहे. या घटनेची माहिती रहिवाशांनी दिल्यानंतर खांदेश्वर पोलिसांनी घटनास्थळी पोहचून माहिती घेतली. हे सर्व करणार्‍याचा शोध पोलीस घेत आहेत.

Check Also

रायगड बॅडमिंटन चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेचे शानदार उद्घाटन

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून …

Leave a Reply