दोघांचा मृत्यू, एक जण जखमी
पनवेल ः वार्ताहर
मुंबई-गोवा महामार्गावर रविवारी (दि. 25) सकाळी पेणकडून पनवेलकडे जाणार्या रिक्षेला पळस्पे येथील जेडब्ल्यूसी कंपनीसमोर ट्रेलरने धडक दिली. या अपघातात रिक्षाचालक आणि प्रवासी महिलेचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला आहे.
प्रभावती चांगा पाटील (रा. जिते, पेण) आणि रिक्षाचालक नाविद नदाब शेख (रा. कल्याण) अशी मृतांची नावे आहेत. जखमीचे नाव समजू शकले नाही. नाविद यांची रिक्षा पळस्पे येथील जेडब्ल्यूसी कंपनीसमोर आली असता भरधाव ट्रेलरने (एमएच 43 बीएक्स 6359) धडक दिली. अपघातानंतर ट्रेलरचालक फरार झाला. त्याच्याविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरू आहे.