Breaking News

रामशेठ ठाकूर महाविद्यालयात बीट्स फेस्ट उत्साहात

खारघर ः रामप्रहत वृत्त

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील सांस्कृतिक समितीतर्फे सहा दिवसाचे बीट्स फेस्ट मोठया उत्साहात पार पडला.

गेल्या दोन वर्षात कोरोना निर्बंधांमुळे महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे सांस्कृतिक कार्यक्रमांमध्येही खंड पडला होता. मात्र यावर्षी महाविद्यालयातील विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे बीट्स फेस्टद्वारे आयोजन करण्यात आले होते.

विद्यार्थ्यांच्या व्यक्तिगत विकासासाठी आणि आपल्या समाजातील पारंपरिक रूढींचा परिचय व्हावा या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय मराठे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. या फेस्टमध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विशेष पारंपरिक वेशभुषा परिधान करून कार्यक्रमात सहभाग घेतला.

कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक समिती विभागप्रमुख प्रा. नमिता सिन्हा, प्रा. रंजना राणा, प्रा. मिनल माडवे, प्रा. मानसी शाह, प्रा. राहुल कांबळे, प्रा. मीरा पटेल, प्रा. प्रियंका पांडे यांनी केले. या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, अध्यक्ष अरूणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, आमदार प्रशांत ठाकूर, संस्थेचे सचिव डॉ. सिध्देश्वर गडदे यांनी आयोजकांचे कौतुक केले.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply