कर्जत : बातमीदार
नेरळ जंक्शन रेल्वे स्थानकाचे व्यवस्थापक म्हणून कर्जत तालुक्यातील वदप गावाचे गुरुनाथ यशवंत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पाटील यांनी नुकताच पदभार स्वीकारला.
नेरळ रेल्वे स्थानकातून माथेरानला जाण्यासाठी मिनीट्रेन चालविली जाते. या रेल्वे स्थानकाचे व्यवस्थापक म्हणून तब्बल 35 वर्षांनी मराठी अधिकारी मिळाला आहे. वदप गावाचे गुरुनाथ पाटील यांची नेरळ रल्वे स्थानक व्यवस्थापक म्हणू नियुक्ती झाल्याने रेल्वे प्रवाशांनी आनंद व्यक्त केला. नेरळ रेल्वे प्रवासी संघटनचे अध्यक्ष संदीप म्हसकर, सचिव राजेश गायकवाड, खजिनदार मिलिंद विरले यांनी गुरुनाथ पाटील यांची भेट घेवून नेरळ रेल्वे स्थानकातील समस्या यांच्याबद्दल सविस्तर चर्चा केली.
नेरळचे उपसरपंच मंगेश म्हसकर,तसेच सुधाकर देसाई यांनी स्थानक व्यवस्थापक पाटील यांना शुभेछा दिल्या.