Breaking News

शाळांमध्ये आषाढी एकादशी उत्साहात साजरी

गव्हाण विद्यालयात विठ्ठल रूख्मीणी पालखी

पनवेल : रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री.छत्रपती शिवाजी विद्यालय व ज.आ.भगत ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशीनिमित्त वृक्षदिंडी व विठ्ठल रखुमाई यांच्या प्रतिमांची पालखी मिरवणूक काढून वृक्ष संवर्धनाचा जयघोष केला.
सकाळी विद्यालयाच्या प्रांगणात विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे ज्येष्ठ सदस्य अनंता ठाकूर व विश्वनाथ कोळी यांनी विठ्ठल रुखुमाईच्या मूर्तींसह सजविलेल्या पालखीचे पूजन करून वृक्षदिंडी मार्गस्थ केली. तत्पूर्वी विद्यालयाच्या प्रांगणातून जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मोरू नारायण म्हात्रे विद्यालय व टी. एन. घरत जुनिअर कॉलेज ऑफ सायन्सच्या विद्यार्थ्यांचीही वृक्षदिंडी मार्गस्थ झाली. विद्यालयाचे पर्यवेक्षक जोशी सर आणि सर्व सेवक वृंद यावेळी उपस्थित होता.
या वेळी विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे ज्येष्ठ सदस्य अनंता ठाकूर, विश्वनाथ कोळी, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष नामदेव ठाकूर, मुख्याध्यापक पी.बी.मंडळे, भोईर सर, विद्यालयाचे उपमुख्याध्यापक तथा प्रभारी प्राचार्य प्रमोद मंडले, ‘रयत’च्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्या ज्योत्स्ना ठाकूर, ‘रयत’चे लाईफ मेंबर व समन्वय समिती आणि जनरल बॉडी सदस्य रवींद्र भोईर, पर्यवेक्षिका विशाखा मोहिते, ज्युनिअर कॉलेज विभागप्रमुख प्रा. बाबुलाल पाटोळे तसेच दोन्ही शाखांचे सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वृक्षदिंडीची सांगता विद्यालयाच्या प्रांगणात विठ्ठल रुक्खमाई च्या आरती आणि भजनांनी झाली. विद्यालयाचे ग्रंथपाल महेश म्हात्रे यांनी केलेल्या सुरेल आरती गायनाने भक्तीमय वातावरण निर्मिती झाली. विद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाने वृक्षदिंडीचे नेटके आणि आकर्षक आयोजन केले.

सीकेटी विद्यालयात विठ्ठल रुक्मिणीचा जयघोष

पनवेल : नवीन पनवेलमधील चांगू काना ठाकूर (सीकेटी) प्राथमिक विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्ताने दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या दिंडी सोहळ्यात विद्यार्थी वारकरी वेशभूषा परिधान करून तर, विद्यार्थिनी डोक्यावर तुळस घेऊन दिंडीत सामील झाल्या होत्या. सुंदर अशा लेझीम पथकाने दिंडीची सुरुवात झाली. विठ्ठल रुक्मिणीचा जयघोष करीत, यावर्षीही रिमझिम पावसाच्या सरींमध्ये, विद्यार्थ्यांनी दिंडी सोहळ्याचा आनंद घेतला.
विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. सुभाष मानकर यांनी दिंडी सोहळ्यात सहभागी होऊन दिंडीची शोभा वाढवली. सरांनी विद्यार्थ्यांसोबत विठ्ठल नामाचा-गजर केला. या वेळी विद्यालयाच्या संगीत शिक्षिका अर्चना पाटील व संगीत शिक्षक संतोष खरेसर यांनी मुलांसमवेत विठुमाऊलीचा गजर सादर केला. मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे तोंड भरून कौतुक केले.

भागूबाई चांगू ठाकूर विद्यालयात विविध कार्यक्रम

उरण : उरण तालुक्यातील द्रोणागिरी येथील भागूबाई चांगू ठाकूर (बीसीटी) शाळेच्या मुख्याध्यापिका अनुराधा काठे यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीचे पूजन करून आषाढी एकादशीच्या सोहळ्यास सुरुवात झाली. एकादशीनिम्मित शाळेमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले गेले होते. त्यात दिंडी, रिंगण, लेझीम नृत्य, भजन व इत्यादी कार्यक्रमांचे खास आकर्षण होते.
शाळेतील विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रुक्मिणी व वारकर्‍यांचे वेश धारण केल्यामुळे शाळेचे रुपांतर मंदिरात झाले होते. मुले टाळ, मृदुंग व विठ्ठलाच्या नामात रंगून गेली होती. इयत्ता सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी गोल रिंगण करून पारंपारिक खेळाचे प्रत्याक्षिक केले. विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी यांनी सहभाग घेवून शाळेजवळील भूपाळी, मल्हार सोसायटी परिसरामध्ये दिंडी काढली. परिसरातील नागरिकांनीदेखील पालखीचे पूजन केले. विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले. दिंडीतील सहभागी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप देखील केला.
आषाढी एकादशीचे औचित्य साधून शाळेत वृक्षरोपणाचा कार्यक्रम देखील पार पडला. विद्यार्थ्यांनी शालेय परिसरात विविध फळ फुल झाडांची लागवड केली.

सीकेटी माध्यमिक विद्यायतात वृक्षदिंडी सोहळा

पनवेल : जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेलमधील चांगू काना ठाकूर माध्यमिक विद्यालयात आषाढी एकादशी – पालखी सोहळा, वृक्षदिंडी कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
विद्यालयाचे मुख्याध्यापक कैलास सत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षदिंडी, पालखी सोहळा, वृक्षारोपण, अभंग, गजर अश्या कार्यक्रमाचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी उत्साहपूर्ण वातावरणात केले. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव श्री. गडदे, सहाय्यक चर्निरोड शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या शिक्षण उपनिरीक्षक निशा वैदू यांच्या हस्ते पालखी-पूजन झाले संत ज्ञानेश्वर माऊली प्रतिमा पूजन झाले, पारंपारिक पद्धतीने काढलेल्या दिंडीमुळे शाळेला जणू पंढरीचे स्वरूप आल्यासारखे भासत होते. विद्यार्थ्यांनी केलेल्या विठ्ठल-रखुमाईच्या वेशभूषेने हा सोहळा अधिक रंगला, विठ्ठल नामाच्या गजराने सोहळा बहरला, वृक्षारोपण कार्यक्रमातून विद्यार्थ्यांस वृक्षसंवर्धनाचे महत्त्व समजले.
आषाढी एकादशी वृक्षदिंडी पालखी सोहळा विद्यालयाचे मुख्याध्यापक कैलास सत्रे, विद्यालयाचे पर्यवेक्षक कैलास म्हात्रे, तसेच उच्च माध्यमिक विद्यालायाचे प्राचार्य प्रशांत मोरे, इंग्रजी माध्यम-माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक संतोष चव्हाण, मराठी माध्यम – प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक सुभाष मानकर, निलिमा शिंदे, वैशाली पारधी अन्य विभाग प्रमुख कार्यक्रमास उपस्थित होते.

कामोठ्याच्या लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये विठुनामाचा गजर

कामोठे : कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मिडियम स्कूल आणि ज्यूनिअर कॉलेज, आषाढी एकादशीनिमित्त घेण्यात आलेलया व कार्यक्रमात विठ्ठल नावाच्या गजरात न्हाऊन निघाल.
विद्यालयात आज सर्वत्र भक्तीमय वातावरण होते, आषाढी एकादशीचा सोहळा उत्साहात झाला. विद्यार्थी वारकरी पोषाखात तर विद्यार्थिनींनी नऊवारी साडी, अशा पारंपारिक, पोशाखामध्ये सहभागी झाले होते. विठ्ठल मूर्तीच्या पूजनाने या भक्तीमय सोहळ्यास प्रारंभ झाला, त्यानंतर आषाढी एकादशीचे महत्त्व विद्यार्थी विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून सांगितले. विद्यार्थ्यांनी अतिशय तालबद्ध अशी लेझीम सादर केली. या नयनरम्य सोहळ्यात सर्व विद्यार्थी विद्यार्थीनींनी खूपच आनंद लुटला. विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच आपल्या पारंपारिक संस्कृतीचे महत्त्व कळावे या हेतूने अशा सोहळ्यांना नेहमीच मार्गदर्शन करणार्‍या विद्यालयाच्या प्राचार्या स्वप्नाली म्हात्रे, यांनी विद्यार्थ्यांचे कौतूक केले, तसेच परंपरा ही अधुनिकतेची जोड आहे, असेही मत व्यक्त केले. या वेळी विद्यालयाच्या पर्यवेक्षिका कुसुम प्रजापती, सारिका लाजूरकर, नेहा खन्ना तसेच सर्व शिक्षक बंधू-भगिनी सहभागी झालेले होते.

छोट्या वारकर्‍यांची सीकेटी शाळेला प्रदक्षिणा

पनवेल : चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालयातील पूर्वप्राथमिक विभाग इंग्रजी माध्यमात मुख्याध्यापिका निलिमा शिंदे व पर्यवेक्षिका वैशाली पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली संकुलात आषाढी वारीचे नियोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात विठ्ठल-रखुमाई यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. या कार्यक्रमात विद्यार्थी वारकरी वेशभूषा करून आले होते. शिक्षक व विद्यार्थ्यांनी जय जय विठोबा रखुमाई या जयघोषात संपुर्ण शाळेला प्रदक्षिणा घातली. तसेच टाळ, वीणा व मृदंगाच्या तालावर ठेका धरून हरीनामाच्या गजरात असे तल्लीन झाले जणु पंढरीच्या विठूरायाचे साक्षात दर्शन झाले.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply